शनिवारी शनि महाराजांना प्रसन्न करण्यासाठी करायचे 5 उपाय

Shani Dev 26 November Panchang, 5 measures to please Shani Maharaj on Saturday : शनिवारी शनि देवाची मनोभावे पूजा केली तर शनि देव प्रसन्न होतात आणि कर्मानुसार योग्य ते फळ देतात. 

Shani Dev
शनिवारी शनि महाराजांना प्रसन्न करण्यासाठी करायचे 5 उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शनिवारी शनि महाराजांना प्रसन्न करण्यासाठी करायचे 5 उपाय
  • शनि देवाला प्रसन्न करण्याचे 5 उपाय
  • 12 राशींवरील शनिचा प्रभाव

Shani Dev 26 November Panchang, 5 measures to please Shani Maharaj on Saturday : शनिवार हा शनि महाराज अर्थात शनि देव यांचा दिवस. शनि ही न्यायदेवता म्हणून ओळखली जाते. शनी देव हे सूर्य पुत्र आणि यमराजाचे भाऊ आहेत. याच कारणामुळे शनिवारी दान करणे, कायदा-नियम पाळणे, प्रामाणिकपणे कष्ट करणे यामुळे पुण्यसंचय करता येतो असे सांगतात. शनिवारी शनि देवाची मनोभावे पूजा केली तर शनि देव प्रसन्न होतात आणि कर्मानुसार योग्य ते फळ देतात. 

आज शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 आहे तर उद्या शनिवार 26 नोव्हेंबर 2022 आहे. शनिवार 26 नोव्हेंबर 2022 रोजी मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील तृतिया आहे. या दिवशी चंद्र धनु राशीत असेल. वृश्चिक राशीत सूर्य, बुध आणि शुक्र या तीन ग्रहांची युती होणार आहे. शनि मकर राशीत 26 नोव्हेंबर 2022 रोजी गोचर करणार आहे. यामुळेच 26 नोव्हेंबरचा शनिवार हा शनि देवाला प्रसन्न करण्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

सध्या धनु, मकर आणि कुंभ या तीन राशींची शनि साडेसाती तर मिथुन आणि तुळ राशीची शनि ढय्या सुरू आहे. येत्या 17 जानेवारी 2023 रोजी धनु रास शनि साडेसातीतून तर मिथुन आणि तुळ रास शनि ढय्येतून मुक्त होणार आहे. शनि साडेसाती आणि शनि ढय्येचा उर्वरित काळात जास्त त्रास होऊ नये आणि शनिची कृपा राहावी यासाठी धनु, मकर, कुंभ, मिथुन आणि तुळ या पाच राशींच्या नागरिकांकरिता शनिवार 26 नोव्हेंबर रोजी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठीचे उपाय करणे आवश्यक आहे.

शनिवारी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ करा. नंतर शनि देवाचे दर्शन घ्या. शनि देवाची मनोभावे पूजा करा. शनि देवासमोर दिवा प्रज्वलित करा. शनि देवाची आरती करा. यानंतर हनुमानाचे (मारुती) दर्शन घ्या. हनुमानाची मनोभावे पूजा करा. हनुमानाला तेल अर्पण करा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. यथाशक्ती दान करा. कायदे आणि नियम पाळा. प्रामाणिकपणे काम करा.

Chanakya Niti: बायका 'हे; काम करत असतील पुरुष गड्यांनी लगेच दुसरीकडे फिरवावे आपले डोळे

Name Astrology : 'या' नावांच्या मुलांचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षा वेगाने काम करतो

शनि देवाची आरती SHANI DEV AARTI IN MARATHI

जय जय श्री शनीदेवा |
पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळतो |
मनोभावे करुनी सेवा || धृ ||

सुर्यसुता शनिमूर्ती |
तुझी अगाध कीर्ति एकमुखे काय वर्णू |
शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||

नवग्रहांमाजी श्रेष्ठ |
पराक्रम थोर तुझा ज्यावरी कृपा करिसी |
होय रंकाचा राजा || जय || २ ||

विक्रमासारिखा हो |
शककरता पुण्यराशी गर्व धरिता शिक्षा केली |
बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||

शंकराच्या वरदाने |
गर्व रावणाने केला साडेसाती येता त्यासी |
समूळ नाशासी नेला || जय || ४ ||

प्रत्यक्ष गुरुनाथ |
चमत्कार दावियेला नेऊनि शुळापाशी |
पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||

ऐसे गुण किती गाऊ |
धणी न पुरे गातां कृपा करि दिनांवरी |
महाराजा समर्था || जय || ६ ||

दोन्ही कर जोडनियां |
रुक्मालीन सदा पायी प्रसाद हाची मागे |
उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||

जय जय श्री शनीदेवा |
पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळीतो |
मनोभावे करुनी सेवा ||

शनि देवाचा बीज मंत्र, Shani Beej Mantra

ॐ शन्नो देवी रभिष्टय आपो भवन्तु पीपतये शनयो रविस्र वन्तुनः।

श्री शनि चालीसा, श्री शनि चालिसा, Shani Chalisa

जय गणेश गिरिजा सुवन, मंगल करण कृपाल।

दीनन के दुख दूर करि, कीजै नाथ निहाल॥

जय जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महाराज।

करहु कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज॥

जयति जयति शनिदेव दयाला।

करत सदा भक्तन प्रतिपाला॥

चारि भुजा, तनु श्याम विराजै।

माथे रतन मुकुट छबि छाजै॥

परम विशाल मनोहर भाला।

टेढ़ी दृष्टि भृकुटि विकराला॥

कुण्डल श्रवण चमाचम चमके।

हिय माल मुक्तन मणि दमके॥

कर में गदा त्रिशूल कुठारा।

पल बिच करैं अरिहिं संहारा॥

पिंगल, कृष्णो, छाया नन्दन।

यम, कोणस्थ, रौद्र, दुखभंजन॥

सौरी, मन्द, शनी, दश नामा।

भानु पुत्र पूजहिं सब कामा॥

जा पर प्रभु प्रसन्न ह्वैं जाहीं।

रंकहुँ राव करैं क्षण माहीं॥

पर्वतहू तृण होई निहारत।

तृणहू को पर्वत करि डारत॥

राज मिलत बन रामहिं दीन्हयो।

कैकेइहुँ की मति हरि लीन्हयो॥

बनहूँ में मृग कपट दिखाई।

मातु जानकी गई चुराई॥

लखनहिं शक्ति विकल करिडारा।

मचिगा दल में हाहाकारा॥

रावण की गति-मति बौराई।

रामचन्द्र सों बैर बढ़ाई॥

दियो कीट करि कंचन लंका।

बजि बजरंग बीर की डंका॥

नृप विक्रम पर तुहि पगु धारा।

चित्र मयूर निगलि गै हारा॥

हार नौलखा लाग्यो चोरी।

हाथ पैर डरवायो तोरी॥

भारी दशा निकृष्ट दिखायो।

तेलिहिं घर कोल्हू चलवायो॥

विनय राग दीपक महं कीन्हयों।

तब प्रसन्न प्रभु ह्वै सुख दीन्हयों॥

हरिश्चन्द्र नृप नारि बिकानी।

आपहुं भरे डोम घर पानी॥

तैसे नल पर दशा सिरानी।

भूंजी-मीन कूद गई पानी॥

श्री शंकरहिं गह्यो जब जाई।

पारवती को सती कराई॥

तनिक विलोकत ही करि रीसा।

नभ उड़ि गयो गौरिसुत सीसा॥

पाण्डव पर भै दशा तुम्हारी।

बची द्रौपदी होति उघारी॥

कौरव के भी गति मति मारयो।

युद्ध महाभारत करि डारयो॥

रवि कहँ मुख महँ धरि तत्काला।

लेकर कूदि परयो पाताला॥

शेष देव-लखि विनती लाई।

रवि को मुख ते दियो छुड़ाई॥

वाहन प्रभु के सात सुजाना।

जग दिग्गज गर्दभ मृग स्वाना॥

जम्बुक सिंह आदि नख धारी।

सो फल ज्योतिष कहत पुकारी॥

गज वाहन लक्ष्मी गृह आवैं।

हय ते सुख सम्पति उपजावैं॥

गर्दभ हानि करै बहु काजा।

सिंह सिद्धकर राज समाजा॥

जम्बुक बुद्धि नष्ट कर डारै।

मृग दे कष्ट प्राण संहारै॥

जब आवहिं प्रभु स्वान सवारी।

चोरी आदि होय डर भारी॥

तैसहि चारि चरण यह नामा।

स्वर्ण लौह चाँदी अरु तामा॥

लौह चरण पर जब प्रभु आवैं।

धन जन सम्पत्ति नष्ट करावैं॥

समता ताम्र रजत शुभकारी।

स्वर्ण सर्व सर्व सुख मंगल भारी॥

जो यह शनि चरित्र नित गावै।

कबहुं न दशा निकृष्ट सतावै॥

अद्भुत नाथ दिखावैं लीला।

करैं शत्रु के नशि बलि ढीला॥

जो पण्डित सुयोग्य बुलवाई।

विधिवत शनि ग्रह शांति कराई॥

पीपल जल शनि दिवस चढ़ावत।

दीप दान दै बहु सुख पावत॥

कहत राम सुन्दर प्रभु दासा।

शनि सुमिरत सुख होत प्रकाशा॥

पाठ शनिश्चर देव को, की हों 'भक्त' तैयार।

करत पाठ चालीस दिन, हो भवसागर पार॥

शनि देवाला प्रसन्न करण्याचे 5 उपाय, 5 ways to please Lord Shani, 5 ways to please Shani Dev

  1. शनिवारी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा. शनि देवाची मनोभावे पूजा करा नंतर शनि देवाची आरती करा तसेच शनि चालिसा आणि शनि मंत्र यांचे पठण करा.
  2. शनिवारी यथाशक्ती दान करा. 
  3. शनिवारी रुग्ण, कुष्ठरोगी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांची सेवा करा.
  4. शनिवारी शमीचे झाड लावा.
  5. कायदे आणि नियम यांचे काटेकोरपणे पालन करा. प्रामाणिकपणे काम करा.

12 राशींवरील शनिचा प्रभाव, Effect of Shani on 12 Zodiac Signs

  1. मेष रास : 2022 आणि 2023 मध्ये शनि साडेसातीचा फेरा किंवा शनि ढय्या नाही
  2. वृषभ रास : 2022 आणि 2023 मध्ये शनि साडेसातीचा फेरा किंवा शनि ढय्या नाही
  3. मिथुन रास : 17 जानेवारी 2023 रोजी शनि ढय्येतून मुक्तता
  4. कर्क रास : 17 जानेवारी 2023 पासून शनि ढय्या सुरू
  5. सिंह रास : 2022 आणि 2023 मध्ये शनि साडेसातीचा फेरा किंवा शनि ढय्या नाही
  6. कन्या रास : 2022 आणि 2023 मध्ये शनि साडेसातीचा फेरा किंवा शनि ढय्या नाही
  7. तुळ रास : 17 जानेवारी 2023 रोजी शनि ढय्येतून मुक्तता
  8. वृश्चिक रास : 17 जानेवारी 2023 पासून शनि ढय्या सुरू
  9. धनु रास : 17 जानेवारी 2023 रोजी शनि साडेसातीच्या फेऱ्यातून मुक्तता
  10. मकर रास : मकर राशीच्या शनि साडेसातीचा अंतिम टप्पा 2023 पासून सुरू
  11. कुंभ रास : कुंभ राशीच्या शनि साडेसातीचा दुसरा टप्पा 2023 पासून सुरू
  12. मीन रास : मीन राशीच्या शनि साडेसातीचा पहिला टप्पा 2023 पासून सुरू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी