शनिदेवाची ढय्या जुलै २०२२ पासून सुरू होणार, या राशींवर दिसेल प्रभाव

Shani Dev Dhaiya or Saturn Dhaiya  will start from July 2022, effect will be seen on these zodiac signs : शनि देव यांनी २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. पण १२ जुलै २०२२ पासून शनि देवाची पुन्हा वक्री चाल सुरू होईल. शनि वक्री झाल्यामुळे पुन्हा दोन राशींच्या नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत.

Shani Dev Dhaiya or Saturn Dhaiya  will start from July 2022, effect will be seen on these zodiac signs
शनिदेवाची ढय्या जुलै २०२२ पासून सुरू होणार, या राशींवर दिसेल प्रभाव  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शनिदेवाची ढय्या जुलै २०२२ पासून सुरू होणार, या राशींवर दिसेल प्रभाव
  • शनि देव यांनी २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश केला
  • १२ जुलै २०२२ पासून शनि देवाची पुन्हा वक्री चाल सुरू होईल

Shani Dev Dhaiya or Saturn Dhaiya  will start from July 2022, effect will be seen on these zodiac signs : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह गोचर करतो त्यावेळी त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर पडतो. कलयुगाचे न्याय दंडाधिकारी शनि देव यांनी २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. पण १२ जुलै २०२२ पासून शनि देवाची पुन्हा वक्री चाल सुरू होईल. शनि वक्री झाल्यामुळे पुन्हा दोन राशींच्या नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत.

शनि देवाने २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. यामुळे मिथुन आणि तुळ रास शनि देवाच्या पीडेपासून मुक्त झाली. कर्क आणि वृश्चिक राशीवर शनि ढय्येचा प्रभाव दिसू लागला. आता १२ जुलै रोजी शनि देव वक्री चालीने मकर राशीत प्रवेश करतील आणि पुन्हा तुळ आणि मिथुन राशीवर शनिचा प्रभाव दिसेल. हा प्रभाव १७ जानेवारी २०२३ पर्यंत राहणार आहे. 

ढय्या सुरू असतानाच्या कालावधीत मकर, तुळ आणि मिथुन राशीच्या नागरिकांनी कायदा आणि नियम यांचे पालन करावे. तब्येत सांभाळावी. कोणतेही चुकीचे वर्तन करू नये. 

ढय्या सुरू असताना संबंधित व्यक्तीच्या खर्चात वाढ होण्याचा धोका असतो. तसेच संबंधित व्यक्तीच्या नोकरी-व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका असतो. कामात अडचणी येण्याची शक्यता असते. यामुळे शनि देवाला प्रसन्न करून त्याची कृपा राहील याची काळजी घेणे हिताचे आहे.

  1. ढय्येचा त्रास होऊ नये किंवा तो सहन करणे सोपे व्हावे यासाठी शनि मंदिरात जाऊन शनि देवाची मनोभावे पूजा करावी, त्याला तेल अर्पण करावे. शनि मंदिरात तेलाचा दिवा तेवता ठेवावा.
  2. हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाची मनोभावे पूजा करावी, त्याला तेल अर्पण करावे. हनुमान मंदिरात तेलाचा दिवा तेवता ठेवावा. हनुमान चालीसा पठण करावे.
  3. गरीब आणि गरजूंना अन्न, पैसे, वस्त्र अशा स्वरुपाचे दान द्यावे.
  4. पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा तेवत ठेवावा. पिंपळाची पूजा करून झाडाला नमस्कार करावा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी