मुंबई: शनीदेव(shani dev) व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. हे शनीदेव पुन्हा एकदा राशीपरिवर्तन(transist) करत आहेत. सध्या शनीदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. या राशीत त्यांनी २९ एप्रिलला प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा शनी ग्रह स्थिती बदलल्याने अन्य राशींवर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणे चांगले असेल. त्या हिशेबाने व्यक्ती पुजा-पाठ करून शनीदेवांना खुश करतील. जाणून घेऊया शनीच्या वक्री अवस्थेत मकर राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे. shani dev transist efffect on this 3 zodiac sign
अधिक वाचा - सतत लघवीला होत असल्यास करा हे प्रभावी घरगुती उपाय
शनी ग्रहाचे राशी परिवर्तन
पुढील महिन्यात १२ जुलैला शनी देव वक्री अवस्थेत मकर राशीत प्रवेश करत आहे यात ते १७ जानेवारीपर्यंत विराजमान राहतील.
मेष रास - या राशीच्या व्यक्तींना धनहानी होण्याची शक्यता असते. सोबतच आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. अशातच तुम्हाला धन आणि आरोग्य दोघांची काळजी घ्यावी लागेल.
सिंह रास - या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. या कारणामुळे मानसिक तणाव उत्पन्न होऊ शकते. व्यापारी वर्गाला पैसा कमावण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतील. यासाठी तुम्हाला मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी पूजा-अर्चा केल्याने लाभ होतील.
अधिक वाचा - NASA ने पोस्ट केले आजवरचे सर्वाधिक खतरनाक फोटो
धनू रास - या राशीच्या लोकांची मानसिक स्थिती बिघडू शकते. मेहनत करूनही फळ लवकर मिळत नाही. या दरम्यान घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. जुना आजार पुन्हा बळावू शकतो. यासाठी थोडी काळजी घ्या.