Astro: शनिदेव जुलैमध्ये होणार वक्री, मिथुन-तूळ राशीवर परिणाम, हे करा उपाय

आध्यात्म
Updated May 20, 2022 | 13:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astro News: शनिदेवांचे एप्रिल महिन्यात राशी परिवर्तन झाले होते आणि आता ते कुंभमध्ये गोचर करत आहेत. मात्र जुलैमध्ये वक्री होणार आहेत. 

shani dev
Astro: शनिदेव जुलैमध्ये होणार वक्री, मिथुन-तूळ राशीवर परिणाम 
थोडं पण कामाचं
  • शनीदेव दोन टप्प्यात राशी परिवर्तन करणार आहेत.
  • ज्योतिषशास्त्राच्या मते शनीची ढय्या सुरू झाल्यानंतर व्यापारात गुंतवणूक करू नये.
  • या दरम्यान आर्थिक निर्णय हे विचारपूर्वक घेतले पाहिजेत.

मुंबई: शनीदेव(shani dev) एप्रिलच्या अखेरीस राशीपरिवर्तन केले होते. शनी आता कुंभ राशीत गोचर करत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत प्रवेश केल्याने दोन राशींवरील साडेसाती कमी झाली आहे. दरम्यान, जुलैमध्ये पुन्हा शनीदेव वक्री होत आहेत ज्यामुळे शनीची ज्या दोन राशींवरील ढय्या संपली होत त्या राशींवर पुन्हा याचा प्रभाव पडेल. 

अधिक वाचा - हनुमान चालिसा म्हणाणाऱ्या राज ठाकरेंना रामलल्ला दर्शन देईना

मिथुन आणि तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनीदेवाची साडेसाती पुन्हा राहणार आहेत. तसेच सूर्यपुत्र काही काळासाठी दोन्ही राशींना प्रभावित करणार आहेत आणि मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देणार. 

या गोष्टींवर ठेवा लक्ष

शनीदेव दोन टप्प्यात राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिषशास्त्राच्या मते शनीची ढय्या सुरू झाल्यानंतर व्यापारात गुंतवणूक करू नये. या दरम्यान आर्थिक निर्णय हे विचारपूर्वक घेतले पाहिजेत. करिअर आणि नोकरीमध्येही यश मिळत नाही. शनी जयंतीच्या दिवशी जर या राशींनी उपाय केल्यास त्यांना खास लाभ मिळू शकतात. शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात तिळाच्या तेलाने दीप लावा आणि दान केल्याने अशुभ प्रभाव कमी होतो. या दिवशी एखाद्या गरजवंताला दान केले पाहिजे. असे केल्याने दुख दूर होते. 

हे करा उपाय

शनीदेवाचा त्रास होऊ नये यासाठी शनीमंदिरात जात देवाची पुजा करावी, शनीदेवाला तेल अर्पण करावे. शनी मंदिरात तेलाचा दिवा लावावा. 

हनुमानाच्या मंदिरात जाऊन पुजा करावी. तसेच तेलही अर्पण करावे. हनुमानाच्या मंदिरात तेलाचा दिवा लावून ठेवावा. 

हनुमान चालिसाचे पठण करावे. 

अधिक वाचा - केंद्र सरकारने सहा राज्यांना दिला इशारा, का दिली Warning?

गरीब तसेच गरजू लोकांना अन्न, पैसे तसेच वस्त्राचे दान करावे. 

पिंपळाच्या झाडाखील तेलाचा दिवा पेटवून ठेवावा. पिंपळाच्या झाडाला यावेळी नमस्कार करावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी