Shani Rashi Parivartan 2022 : ३० वर्षांनी शनि स्वराशीत येणार; 'या' राशीच्या नागरिकांनी घ्यावी काळजी

shani sadesati on this zodiac sign 2022 : सध्या मकर राशीत असलेला शनि ग्रह ३० वर्षांनंतर स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

shani sadesati on this zodiac sign 2022
शनि स्वराशीत येणार; 'या' राशीच्या नागरिकांनी घ्यावी काळजी 
थोडं पण कामाचं
  • शनि स्वराशीत येणार; 'या' राशीच्या नागरिकांनी घ्यावी काळजी
  • मकर राशीत असलेला शनि ग्रह ३० वर्षांनंतर स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार
  • शनिने कुंभ राशीत प्रवेश करताच धनु रास साडेसातीच्या त्रासातून मुक्त होईल

shani sadesati on this zodiac sign 2022 : शनि देवाच्या प्रकोपापासून कोणीही सुरक्षित नाही असे म्हणतात. चुकीचे वागले-बोलले, खोटे वागलात-बोललात तर शनि देवाचा प्रकोप होतो; असे म्हणतात. शनि देवाची कृपादृष्टी झाल्यास प्रगती होते, प्रतिष्ठा वाढते आणि जीवनातील आनंद द्वीगुणीत होतो. पण शनि देवाचा प्रकोप झाला तर राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर आणि धर्म-अध्यात्म यावर विश्वास आहे ते आपल्यावर शनि देवाची कृपादृष्टी राहावी यासाठी प्रयत्न करतात. शनि हा ग्रह दर अडीच वर्षांनी म्हणजेच ३० महिन्यांनी राशी बदलतो. सध्या मकर राशीत असलेला शनि ग्रह ३० वर्षांनंतर स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

सूर्य पुत्र शनि २९ एप्रिल २०२२ रोजी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. शनिने कुंभ राशीत प्रवेश करताच धनु रास साडेसातीच्या त्रासातून मुक्त होईल. मीन राशीची साडेसाती सुरू होईल. कुंभ राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. २०२२ मध्ये शनि गोचरानंतर कर्क आणि वृश्चिक राशीवर शनि ढय्येचा प्रभाव जाणवू लागेल. मिथुन आणि तुळ रास शनि ढय्येपासून मुक्त होईल. 

शनिची साडेसाती अथवा शनिची ढय्या सुरू असेल तर शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी आंघोळ करुन शनि मंदिरात जाऊन पूजन करा. मंदिरात शनि देवाच्या मूर्तीच्या थोडे उजवीकडे किंवा डावीकडे उभे राहा. मोहरीच्या तेलाने शनि देवाला अभिषेक करा. शनि मंत्र आणि शनि चालिसा यांचे पठण करा. गरजूंना दानधर्म करा. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान (पैसे दान म्हणून देणे) करा. फायदा होईल. शक्य असल्यास दररोज शनि देवाचे दर्शन घेऊन त्याचा अभिषेक करावा तसेच मनोभावे शनि देवाचे पूजन करावे. हनुमानाचे अर्थात मारुतीरायाचे पूजन करा, पिंपळाच्या झाडाची पूजा करा. शनीची मूर्ती आणि पिंपळासमोर दिवा लावा. शनिशी संबंधित वस्तू म्हणजेच तेल, लोखंड, काळे मसूर, काळे बूट, काळे तीळ, कस्तुरी यांचे दान करा. 

शनि देव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी