मुंबई: शनी ग्रह(shani) आज म्हणजेच २९ एप्रिलला कुंभ राशीमध्ये गोचर करत आहेत. शनी अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन(zodiac sign transist) करत आहेत आणि ३० वर्षांनी आपली राशी कुंभमध्ये प्रवेश करत आहेत. शनी १२ जुलैपर्यंत कुंभमध्ये राहणार आहे. यानंतर काही महिन्यांसाठी वक्री चाल चालणार आहे. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशाने काही राशींना साडेसातीपासून सुटका मिळेल तर काही राशींच्या व्यक्ती शनीच्या साडेसातीने पिडीत होतील.
अधिक वाचा - लाऊडस्पीकरवरील वादात रामदास आठवलेंची उडी
वैदिक ज्योतिषानुसार शनीग्रह मंद वेगाने भ्रण करत असते. त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी ३० महिन्यांचा कालावधी लागतो. त्या हिशेबाने शनी आपली रास कुंभमध्ये तब्बल ३० वर्षांनी संक्रमण करत आहेत. शनीदेवाला न्यायाधीशाचे पद मिळाले आहे. शनिदेव हे व्यक्तीच्या चांगल्या वाईट कामाचा हिशेब ठेवतात. आणि त्या व्यक्तीला त्या हिशेबाने फळ देतात. जाणून घेऊया शनिचे हे संक्रमण कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
शनीचे राशी परिवर्तन होताच मीन राशीच्या व्यक्तींवर शनीची साडेसाती सुरू होणार आहे. साडे सातीचे अडीच-अडीच वर्षांचे तीन टप्पे असतात. याशिवाय शनीच्या कुंभमधील प्रवेशाने कर्क आणि वृश्चिक राशीवरही परिणाम होणार आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांना अधिक सतर्क राहावे लागेल. कारण या दरम्यान शनी आर्थिक, शारिरीक, सन्मानाची हानी करू शकतो. तसेच मानसिक तणावही येऊ शकतो.
अधिक वाचा - या खास गोष्टीमुळे वंदे भारतचा प्रवास होणार अधिक आरामदायक
शनी आतापर्यंत मकर राशीत होता ज्यामुळे धनू, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचा परिणाम होता मात्र २९ एप्रिल २०२२ला शनीने राशी परिवर्तन करताच धनू राशीच्या व्यक्तींची शनीच्या साडेसातीतून सुटका होईल. सोबतच मकर राशीवर शनीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशींवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. याशिवा मिथुन आणि तूळ राशीच्या व्यक्तींनाही दिलासा मिळेल.