शनिदेव उघडणार 'या' राशींच्या नशिबाचे दार

shani vakri effect on these zodiac sign people know remedies to pleased shani dev : ज्योतीषशास्त्रानुसार रविवार ५ जून २०२२ रोजी शनि देव अर्थात शनि ग्रह कुंभ राशीत वक्री होणार आहे.

shani vakri effect on these zodiac sign people know remedies to pleased shani dev
शनिदेव उघडणार 'या' राशींच्या नशिबाचे दार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शनिदेव उघडणार 'या' राशींच्या नशिबाचे दार
  • वक्री शनि कोणत्या राशींसाठी लाभाचा?
  • शनि देवाला प्रसन्न करण्याचे उपाय

shani vakri effect on these zodiac sign people know remedies to pleased shani dev : ज्योतीषशास्त्रानुसार रविवार ५ जून २०२२ रोजी शनि देव अर्थात शनि ग्रह कुंभ राशीत वक्री होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह गोचर करतो किंवा वक्री होतो तेव्हा त्याचा प्रभाव ज्योतीषशास्त्रानुसार सर्व बारा राशींवर दिसतो. हा प्रभाव जसा शुभ असू शकतो तसाच अशुभ पण असू शकतो. यामुळेच हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, कुंभ राशीत शनि वक्री झाल्यानंतर कोणत्या राशीवर काय परिणाम होणार.

शनि या ग्रहाने २९ एप्रिल २०२२ रोजी स्वतःच्या कुंभ राशीत गोचर केले. ही घटना तब्बल ३० वर्षांनी घडली. या कालावधीत ज्या राशींची साडेसाती किंवा ढय्या सुरू आहे त्या राशींच्या नागरिकांना आव्हानांना आणि अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शनि ग्रह ५ जून रोजी स्वतःच्या कुंभ राशीत वक्री होणार आहे. याचा थेट परिणाम दोन राशींवर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या दोन राशींच्या नागरिकांच्या नशिबाचे दार उघडणार आहे, त्यांचा भाग्योदय होणार आहे. 

वक्री शनि कोणत्या राशींसाठी लाभाचा?

वृषभ रास : ज्योतीषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या नागरिकांना कामांमध्ये यश मिळेल. गोड बोलून आणि हुशारीने वागून वृषभ राशीचे नागरिक अनेक कठीण कामं सहज पूर्ण करू शकतील. आव्हाने पार करू शकतील. प्रगतीचा योग आहे. शुभकार्याचा योग आहे.

कन्या रास : ज्योतीषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या नागरिकांना कामांमध्ये यश मिळेल. शनि वक्री असल्यामुळे कन्या राशीच्या नागरिकांनी घरातील सदस्यांची काळजी घ्यावी. आनंदवार्ता कळण्याचा योग आहे. 

शनि देवाला प्रसन्न करण्याचे उपाय

  1. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, जलदान (पाण्याचे दान), पैशांच्या स्वरुपातले दान करावे
  2. आंघोळ करून शनि देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करा. शनि देवाची मनोभावे पूजा करा. शनि देवासमोर Mustard Oil अर्थात मोहरीच्या तेलाचा दिवा तेवत ठेवा. 
  3. दररोज शनि चालीसा पठण आणि शनि मंत्र यांचा जप करा
  4. आजारी व्यक्तींची सेवा करा, गरजूंना मदत करा, अहंकाराला दूर ठेवा. गरजूंना दानधर्म करा.
  5. अहंकाराचा त्याग करा. कोणाचाही कळत नकळत का होईना पण अपमान करू नका, श्रमिकांचा (कष्टकरी वर्ग) आदर करा.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी