Shani Gochar 2022 Effect । मुंबई : अलीकडेच ५ जून रोजी शनिदेव यांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. यासोबतच ३ राशींवर साडेसातीचा प्रकोप चालू आहे आणि २ राशी धैय्याशी संघर्ष करत आहेत. शनीची साडेसाती आणि धैय्याचे नाव ऐकताच मनात एक वेगळीच भीती निर्माण होते. कारण यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. यामुळे पैशाची हानी सुरू होते. शनीचा प्रकोप टाळण्यासाठी मनुष्य विविध उपाय करतो. ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीचा प्रकोप तीन टप्प्यात होतो. पहिल्या टप्प्यात, ते मनुष्याच्या आर्थिक संसाधनास हानी पोहोचवते. दुसऱ्या टप्प्यात, कुटुंब आणि आरोग्यास हानी पोहचवतो आणि तिसरा टप्पा मनुष्याच्या सर्व भौतिक संसाधनांचे नुकसान करतो. त्यामुळे शनिदेवाची साडेसाती अत्यंत घातक आहे. सध्या शनि कुंभ राशीत आहे. लक्षणीय बाब म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना २०२५ पर्यंत शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. (Shani will increase the headaches of these people by 2025).
अधिक वाचा : झेब्राच्या कळपातला वाघ शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम
५ जून २०२२ ते २९ मार्च २०२५ पर्यंत शनि कुंभ राशीत राहील. यावेळी कुंभ राशीच्या लोकांवर शनीचा अधिक प्रभाव राहील. त्यांच्यावर शनिदेवाच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी यावेळी धनहानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरूअसलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.