Shani Gochar July 2022: ६ महिने आपल्या प्रिय राशीत राहणार शनिदेव; या लोकांना मिळणार नवीन नोकरी, पैशाने होणार मालामाल

Vakri Shani Gochar July 2022 | शनिदेव सध्या कुंभ राशीत असून वक्र चालीत आहेत. १२ जुलै रोजी शनि ग्रह त्याच्या स्वतःच्या राशीत अर्थात मकर राशीत प्रवेश करेल आणि प्रतिगामी वाटचाल करेल.

Shanidev will stay in his beloved zodiac for 6 months
६ महिने आपल्या प्रिय राशीत राहणार शनिदेव, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शनिदेव सध्या कुंभ राशीत असून वक्र चालीत आहेत.
  • १२ जुलै रोजी शनि ग्रह त्याच्या स्वतःच्या राशीत अर्थात मकर राशीत प्रवेश करेल.
  • शनिदेव ६ महिने मकर राशीत राहतील.

Saturn Transit July 2022 । मुंबई : शनिदेव सध्या कुंभ राशीत असून वक्र चालीत आहेत. १२ जुलै रोजी शनि ग्रह त्याच्या स्वतःच्या राशीत अर्थात मकर राशीत प्रवेश करेल आणि प्रतिगामी वाटचाल करेल. लक्षणीय बाब म्हणजे शनिदेव ६ महिने मकर राशीत राहतील. मकर राशीतील प्रतिगामी शनीचे संक्रमण काही लोकांसाठी वरदान ठरेल. शनि मकर राशीत गेल्याने त्यांना खूप फायदा होईल. करिअर-आर्थिक स्थितीत प्रचंड फायदा होईल. चला तर म जाणून घेऊया कोणत्या ३ राशींचे नशीब चमकणार आहे. (Shanidev will stay in his beloved zodiac for 6 months). 

अधिक वाचा : फुकटात लग्न करण्याचे पर्याय

या ३ राशी पैशाने होणार मालामाल

  1. वृषभ राशी - शनीचे संक्रमण शुभ काळ घेऊन येत आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. जर तुम्ही नोकऱ्या बदलत नसाल तर तुमचे सध्याचे नोकरीतच चांगले प्रमोशन होऊ शकते. एकूणच करिअरमध्ये वाढ होणे निश्चित आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. धनलाभ होईल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक चिंता कमी होईल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. अविवाहित लोकांना जोडीदार मिळू शकतो.
  2. धनु राशी - प्रतिगामी शनीचा मकर राशीत प्रवेश धनु राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. ६ महिन्यांसाठी त्यांना फक्त नफा मिळेल. अचानक पैसे मिळतील. उत्पन्न वाढेल. अडकलेलेही पैसे देखील परत मिळतील. नोकरी आणि बिझनेस या दोन्हीसाठी हा काळ चांगला आहे. व्यावसायिकांना फायदा होईल आणि नोकरी शोधणाऱ्यांची प्रगती होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी आणि भागीदारीत काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
  3. मीन राशी - प्रतिगामी शनिचे संक्रमण मीन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. उत्पन्न वाढेल. ६ महिन्यांत लाभाच्या अनेक संधी मिळतील. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तयार होतील. व्यावसायिकांना मोठे सौदे मिळू शकतात. तर दुसरीकडे नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळू शकते. ते महान गोष्टी साध्य करू शकतात. नवीन नोकरीची ऑफर मिळण्याचीही जोरदार शक्यता आहे. जुन्या वादात विजय मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी