शनिकृपेसाठी शनिवारी 'या' कृती करणे टाळा

Shaniwar Astro Tips in Marathi Avoid doing these actions on Saturday for Shani grace : शनिवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी विशिष्ट कृती करून आणि विशिष्ट कृती टाळून आपण शनिदेव आणि भगवान हनुमान (मारुती) यांना प्रसन्न करू शकता.

Shaniwar Astro Tips in Marathi Avoid doing these actions on Saturday for Shani grace
शनिकृपेसाठी शनिवारी 'या' कृती करणे टाळा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • शनिकृपेसाठी शनिवारी टाळायच्या कृती
 • शनिकृपेसाठी शनिवारी करायच्या कृती
 • शनिवारी दानधर्म करा

Shaniwar Astro Tips in Marathi Avoid doing these actions on Saturday for Shani grace : शनिवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी विशिष्ट कृती करून आणि विशिष्ट कृती टाळून आपण शनिदेव आणि भगवान हनुमान (मारुती) यांना प्रसन्न करू शकता. शनि देवाची कृपा राहिली तर अडचणी दूर होतील. मोठ्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होईल. सुखसमृद्धी लाभेल. ज्यांना शनि पीडेचा, शनिच्या साडेसातीचा अथवा शनिच्या ढय्येचा त्रास होत आहे त्यांनी प्राधान्याने शनि कृपेसाठी प्रयत्न करणे त्यांच्या फायद्याचे आहे. 

'अशा' हस्तरेषा असल्यास चाळीशीत होईल उल्लेखनीय प्रगती

असे दिसेल अयोध्येचे राम मंदिर

शनिकृपेसाठी शनिवारी टाळायच्या कृती

 1. शनिवारी मांसाहार, मद्यपान, धूम्रपान करणे टाळा
 2. शनिवारी लोखंड, लोखंडाच्या वस्तू, लाकूड, लाकडाच्या वस्तू, कोळसा, मीठ, खरेदी करणे टाळा. 
 3. शनिवारी पूर्व, उत्तर आणि ईशान्य या तीन दिशांना प्रवासाची सुरुवात करणे टाळा. 
 4. शनिवारी कोणालाही अपशब्द (शिव्या देणे) वापरणे, कोणाचाही अपमान करणे टाळा.
 5. शनिवारी केस कापणे आणि नखे कापणे टाळा.
 6. शनिवारी खोटे बोलणे, फसविणे टाळा.
 7. शनिवारी सासुरवाडीला जाणे टाळा.

शनिकृपेसाठी शनिवारी करायच्या कृती

 1. शनिवारी शनि देवाचे आणि भगवान हनुमान यांचे दर्शन घ्या.
 2. शनिवारी शनि देवाला आणि भगवान हनुमान यांना तेल, नारळ अर्पण करा.
 3. शनिवारी शनि चाळीसा म्हणा.
 4. शनिवारी मारुतीस्तोत्र म्हणा.
 5. शनिवारी दानधर्म करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी