शंखाला का मानलं जातं देवी लक्ष्मीचा छोटा भाऊ?

आध्यात्म
Updated Jul 23, 2019 | 16:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

वैदिक शास्त्रात शंख हे खूप पवित्र मानलं जातं. शंखाचा आकार, प्रकार आणि ध्वनी याच्याशी निगडीत काही खास गोष्टी आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

shankh_insta
शंखाला का मानलं जातं देवी लक्ष्मीचा छोटा भाऊ?  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • शंखनाद सकारत्मक उर्जा आपल्याला प्रदान करतंय
  • शंखाचे फक्त आधात्मिकच नव्हे तर वैज्ञानिकरित्याही फायदे
  • लक्ष्मीचा छोटा भाऊ म्हणून देखील शंख मानलं जातं

मुंबई: प्राचीन काळापासून पूजेमध्ये शंखाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक वैदिक कार्यात शंख महत्त्वाचं मानलं गेलं आहे. एवढंच नव्हे तर असंही मानलं जातं की, शंख ज्या ठिकाणी असतो तिथे सुख-शांती, धन वैभव याचा वास असतो. शंख हे मंगलकारी मानलं गेलं आहे. त्यामुळे शंखाचं महत्त्व किती आहे हे आपणाला कळू शकतं. एवढंच नव्हे तर प्राचीन काळी युद्ध आरंभ करण्याआधी शंखनाद देखील केला जायचा. 

जिथे शंखनाद होतो तिथे कायमच सकारात्मक उर्जा असते. अध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण असल्याने घरात शंखनाद करणं हे शुभ मानलं जातं. शंख हे भगवान विष्णूचं प्रमुख अस्त्र आणि शस्त्र देखील मानलं जातं. चला तर मग जाणून घेऊयात शंखासंबंधी अनेक रोमांचक गोष्टी. 

शंख का मानलं जातं लक्ष्मीचा छोटा भाऊ?

शंखाचे तसे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख  हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. 

गंगा-यमुना-सरस्वती यांच्यासह अनेक देवता करतात शंखामध्ये वास 

शंख यामुळे पूजनीय मानलं जातं की, यामध्ये अनेक देवतांचा वास असतो. त्यामुळेच शंखाला पूजा स्थळावर विशेष स्थान देण्यात येतं. दक्षिणावर्ती शंखाच्या वरच्या बाजूला चंद्राचा वास असतो असं मानलं जातं. तर मध्य भागात वरुणाचा वास असतो. तर शंखाच्या पृष्ठ भागात ब्रम्हा आणि अग्र भागात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा वास असतो असं म्हटलं जातं. 

शंखातील पवित्र जल हे तीर्थासमान मानलं जातं

असं नेहमी म्हटलं जातं की, शंखातील पवित्र जल हे तीर्थासमान असतं. असंही मानलं जातं की, जिथे कुठे शंख असेल तिथे स्वत: विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो. एवढंच नव्हे तर जो शंखाने जल स्नान करतो त्याला तीर्थासमान फळ मिळतं. 

विजयाचं प्रतिक मानलं जातं शंख 

जिथे शंखनाद होतं तिथे ईश्वराची कृपादृष्टी असते. याचाच अर्थ असा की, शंखनादाचा अर्थ हा विजयाचं प्रतिक देखील मानलं जातं. शंखातील ध्वनी जिथवर पोहचतो तिथवर सकारात्मक उर्जा पसरते असं नेहमी म्हटलं जातं. त्यामुळे तेथील वातावरण हे शुद्ध असतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ชื่นใจ #ConchShell #สังข์ #Shankh ???

A post shared by Kreetha Simavara (@top_top) on

महाभारतात पांडव आणि कृष्णाजवळ होते वेगवेगळे शंख

महाभारतात युद्धावेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होतं. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचं खूपच मोठं असं शंख होतं. जे तो वाजवायचा. तर युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होतं. यापैकी एका शंखाचा आवाज करुन युद्धाची सुरुवात केली जायची. 

शंख वाजवणं हे आरोग्यासाठी देखील चांगलं समजलं जातं. ज्यांना श्वसनाचे विकार आहेत किंवा डोकेदुखी, कानाच्या समस्या आहेत. त्यांनी जरुर शंखनाद केला पाहिजे. त्याचा थेट फायदा त्यांना या समस्या दूर करण्यास होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी