Shirdi Sai Baba Mantra: साईबाबांच्या 'या' 12 मंत्रांचा करा जप; रखडलेली कामे होतील पूर्ण अन् होईल भरभराट

Sai Baba Mantra: शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातून भाविक येत असतात. साईबाबांची भाविक नियमित पूजा देखील करत असतात. साईबाबांच्या 12 मंत्रांचा जप केल्याने विशेष कृपा कायम राहते.

Shirdi Sai baba mantra chant every day for success and prosperity read in marathi
Shirdi Sai Baba Mantra: साईबाबांच्या 'या' 12 मंत्रांचा करा जप; रखडलेली कामे होतील पूर्ण अन् होईल भरभराट 
थोडं पण कामाचं
  • साईबाबांचे जगभरात भाविक
  • साईबाबांनी केलेल्या चमत्काराबाबत अनेक पौराणिक कथा आहेत 
  • दु:खात असलेल्या भाविकांना साईबाबा नेहमी आधार देतात 

Sai Baba mantra jap in marathi: शिर्डीतील साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. साईबाबांची नित्यनेमाने पूजा देखील करत असतात. साईबाबांच्या भाविकांची भावना आहे की, साईंची नियमित पूजा केल्याने त्यांच्यावर बाबांची विशेष कृपा राहते. इतकेच नाही तर साईबाबांचे व्रत केल्यास आपल्यावर येणारे संकट दूर होते, रखडलेले कामही पूर्ण होते असे मानले जाते. (Sai baba Mantra)

धार्मिक मान्यतांनुसार, साईबाबांच्या मंत्रांचा नियमित जप करणाऱ्या व्यक्तीला सुख, समृद्धी, आनंद प्राप्त होते. साईबाबांची पूजा करताना दररोज 12 मंत्रांचा जप करणे लाभदायक मानले जाते. पाहूयात कुठले आहेत हे 12 मंत्र.

हे पण वाचा : म्हणून रकुल प्रीत सिंगला 10 वेळा बदलावी लागली शाळा​

साईबााबांच्या मंत्रांचा जप

  1. ॐ साई राम 
  2. ॐ साई गुरुवाय नमं: 
  3. सबका मालिक एक है 
  4. ॐ साई देवाय नम: 
  5. ॐ शिर्डी देवाय नम: 
  6. ॐ समाधिदेवाय नम: 
  7. ॐ सर्वदेवाय रूपाय नम: 
  8. ॐ शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमही तन्नो साई प्रचोदयात 
  9. ॐ अजर अमराय नम: 
  10. ॐ मालिकाय नम: 
  11. जय जय साई राम 
  12. ॐ सर्वज्ञा सर्व देवता स्वरूप अवतारा

मंत्रांचा जप असा करा 

साईबाबांच्या या मंत्रांचा दररोज जप करावा. या मंत्रांचा जप केल्यास आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, त्रास, अडचणी दूर होतात. साईबाबांच्या मंत्रांचा जप करण्यासाठी साईबाबांची मूर्ती समोर ठेवावी. मूर्तीवर दूध आणि जलाभिषेक करावे.

त्यानंतर साईबाबांना पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि पिवळी फुले अर्पण करावी. त्यानंतर मनापासून आरती करून साईबाबांची पूजा करा. आरती केल्यावर साईबाबांच्या या 12 मंत्रांचा जप करा. या मंत्रांचा जप केल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक वातावरण दूर होईल आणि घरात सुख-शांती येईल. तसेच घरात भरभराटही होण्यास सुरुवात होईल.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी