Ram Navami Utsav in Shirdi: शिर्डीत श्रीरामनवमी उत्सवाचा उत्साह, असा आहे तीन दिवसांचा संपूर्ण कार्यक्रम

Ram Navami Utsav in Shirdi Sai Baba Temple: श्रीरामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जाणून घ्या कसा असेल शिर्डीतील हा श्री रामनवमी उत्सवाचा कार्यक्रम....

Shirdi Sai baba ram navami utsav 2023 here are full schedule of program read in marathi
Ram Navami Utsav in Shirdi: शिर्डीत श्रीरामनवमी उत्सवाचा उत्साह, असा आहे तीन दिवसांचा संपूर्ण कार्यक्रम (Photo: @SSSTShirdi Twitter) 
थोडं पण कामाचं
  • रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत जय्यत तयारी
  • 29 मार्च ते 31 मार्च 2023 या काळात साजरा होणार श्रीरामनवमी उत्सव

Shrdi Shri Ram Navami Utsav schedule: शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षी श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. या उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्ध करण्यात येत असते आणि त्याच प्रमाणे यंदाही शिर्डीत रामनवमी उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Shirdi Sai baba ram navami utsav 2023 here are full schedule of program read in marathi)

श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात 1991 मध्ये साईबाबांच्या अनुमतीने करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी शिर्डीत श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊ लागला. यंदाच्या वर्षी शिर्डीतील साईमंदिरातील रामनवमी उत्सवाचा कार्यक्रम कसा असणार आहे याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांनी आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून दिली आहे. जाणून घेऊयात नेमका कसा असेल यंदाचा श्रीरामनवमी उत्सव....

हे पण वाचा : 6 सेकंदात Google शोधून दाखवा, 95 टक्के होतात फेल

29 मार्च - शिर्डीतील साईबाबा श्रीरामनवमी उत्सव प्रारंभ 

  1. पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती
  2. पहाटे 5.45 वाजता श्रींच्या फोटोची आणि पोथीची मिरवणूक
  3. सकाळी 6 वाजता द्वारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण
  4. सकाळी 6.20 मिनिटांनी श्रींचे मंगलस्नान आणि दर्शन
  5. सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपूजा
  6. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती आणि तीर्थप्रसाद 
  7. दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर कीर्तन
  8. संध्याकाळी 6.30 वाजता धूप आरती
  9. रात्री 7.15 ते 9.30 वाजेपर्यंत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम
  10. रात्री 9.15 वाजता चावडीत श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार
  11. मिरवणूक परत आल्यावर रात्री 10.30 वाजता शेजारती होईल
  12. यादिवशी पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर सुरू राहील

हे पण वाचा : हे उपाय करा अन् डास चावल्यावर येणारी खाज पळवा

श्रीरामनवमी - गुरुवार 30 मार्च 

  1. पहाटे 5.15 वाजता - श्रींची काकड आरती
  2. पहाटे 5.45 वाजता - अखंड पारायणाची समाप्ती होऊन श्रींच्या फोटो आणि पोथीची मिरवणूक
  3. सकाळी 6.20 वाजता कावडींची मिरवणूक आणि श्रींचे मंगलस्नान आणि दर्शन
  4. सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपूजा
  5. सकाळी 10 ते 12 यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर श्रीरामजन्म किर्तीन कार्यक्रम
  6. दुपारी 12.30 वाजता - माध्यान्ह आरती 
  7. दुपारी 4 वाजता - निशाणांची मिरवणूक
  8. सायंकाळी 5 वाजता - श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक 
  9. मिरवणूक परतल्यावर सायंकाळी 6.30 वाजता धुपारती
  10. सायंकाळी 7.15 ते रात्री 9.15 या वेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम
  11. रात्री 9.15 - श्रींची गुरुवारची नित्याची पालखी मिरवणूक
  12. रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत - श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा कार्यक्रम
  13. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरू राहणार आहे

हे पण वाचा : गरोदरपणात कारले खावे की नाही?

उत्सवाची सांगता - शुक्रवार दिनांक 31 मार्च

  1. पहाटे 5.05 वाजता - श्रींचे मंगलस्नान आणि दर्शन
  2. सकाळी 6.50 वाजता श्रींची पाद्यपुजा
  3. सकाळी 7 वाजता - गुरुस्नान मंदिरात रुद्राभिषेक 
  4. सकाळी 10 वाजता - गोपाळकाला कीर्तन आणि दहीहंडी कार्यक्रम 
  5. दुपारी 12.10 वाजता - माध्यान्ह आरती आणि तीर्थप्रसाद 
  6. सायंकाळी 6.30 वाजता - धुपारती
  7. सायंकाळी 7.15 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत - निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम
  8. रात्री 10 वाजता - श्रींची शेजारती होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी