Shravan month 2020: श्रावण महिन्याच्या शुभेच्छा, Whatsapp Message 

आध्यात्म
Updated Jul 21, 2020 | 10:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shravan month 2020: श्रावण महिन्याला २१ जुलैला सुरूवात होत आहे. श्रावण महिन्यात सण-उत्सव साजरे केले जातात. या महिन्यात उपवासही केले जातात.

shravan month
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा, Whatsapp Message  

थोडं पण कामाचं

  • श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांचा महिना
  • या महिन्यात ऊन-पावसाचा खेळ रंगतो
  • या महिन्यात सात्विक आहार केला जातो

मुंबई:  आषाढ महिन्यातील अमावस्या कालच (२० जुलै) संपन्न झाली. यालाच दीप अमावस्या (Deep amavasya) म्हणतात. आजपासून (२१ जुलै) श्रावण महिन्याला (shravan month) सुरूवात झाली आहे. श्रावण महिना म्हणजे हर्ष, उत्साहाचा महिना. ऊन-पावसाचा खेळ. इंद्रधनुचा रंग याच श्रावणात पाहायला मिळतो. श्रावण महिना सुरू झाला की ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो. कधी अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळतात तर कधी अचानक ऊन पडते. श्रावण महिन्यात सण-समारंभ मोठ्या प्रमाणात असतात. श्रावण महिन्याच्या सुरूवातीला येतो तो सण म्हणजे नागपंचमी.  यादिवशी नागाची पुजा केली जाते.

कोकणात या दिवशी बऱ्याचशा घरांमध्ये हौसाची परंपरा आहे. म्हणजेच भाताच्या लाह्या नागदेवतेला प्रसाद म्हणून दाखवल्या जातात. त्यानंतर बायका सुंदर साडी नेसून छान तयारी करून प्रत्येक घरातील मोठ्या माणसांना या लाह्या देऊन त्यांच्या पाया पडतात. नागपंचमीनंतर येतो तो सण म्हणजे रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा. रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहिण-भावाच्या नात्यांचा सण. नारळी पोर्णिमेला समुद्राला नारळ अर्पून पुजा केली जाते. यानंतर येणारा सण म्हणजे गोपाळकाला. या दिवशी सगळे गोपाळ मिळून दहीहंडी फोडतात. दहीकाला साजरा केला जातो. श्रावण महिन्यात उपवास आणि सणांची मेजवानी असते. या महिन्यात सात्विक आहार केला जातो. पुजा अर्चा केली जाते. 

श्रावणात सोमवार, शनिवार या दिवशी उपवास केले जातात. या संपूर्ण महिन्यात सात्विक आहार घेतला जातो. या महिन्यानंतर येणारा सण म्हणजे गौरी-गणपती. श्रावण महिना संपंल्यानंतर भाद्रपद महिन्यात गणपतीचे आगमन होते. 


श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हासरा नाचरा,जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला

रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने प्यावा
वर्षाऋतू तरी
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा

यक्षप्रश्न मनी झाला
का बरे निसर्ग गाऊ लागला
संगती झाडे वेली
अरे खुल्या मना रे
हा बघ श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला मोठे महत्त्व आहे. वर्षभरातील या महिन्यात सगळ्यात जास्त सण साजरे केले जातात. श्रावण महिन्यात अनेक जणांचे उपवासही असतात. विविध सणांचे आगमनही याच महिन्यात होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी