Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावणातील पहिला सोमवार; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 01, 2022 | 08:05 IST

भक्तीचा श्रावण महिना सुरू झाला असून  आज श्रावण (Shravan 2022) महिन्यातला पहिला सोमवार आहे. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्वाचे समजले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची (Mahadev) पूजा (Worship ) करायची धार्मिक परंपरा (religious tradition) आहे. श्रावण सोमवारी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे.

Shravan Somvar Vrat 2022
आज श्रावणातील पहिला सोमवार, जाणून घ्या शिवशंकराची पूजा विधी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • श्रावणाचा महिना आणि सोमवार हे शंकराच्या पूजेसाठी विशेष आहे.
  • या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते.
  • चांगला जोडीदार लाभावा यासाठी अविवाहित महिला (unmarried woman) श्रावणात सोमवारी महादेवाची पूजा करतात.

Shravan Somvar Vrat 2022 : भक्तीचा श्रावण महिना सुरू झाला असून  आज श्रावण (Shravan 2022) महिन्यातला पहिला सोमवार आहे. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्वाचे समजले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची (Mahadev) पूजा (Worship ) करायची धार्मिक परंपरा (religious tradition) आहे. श्रावण सोमवारी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चांगला जोडीदार लाभावा यासाठी अविवाहित महिला (unmarried woman) श्रावणात सोमवारी महादेवाची पूजा करतात. 

श्रावणाचा महिना आणि सोमवार हे शंकराच्या पूजेसाठी विशेष आहेत. त्यामुळे, या दिवशी शंकराच्या प्रत्येक लहान-मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. श्रावणी सोमवारचं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा-मनोकामना पूर्ण होतात. सगळे त्रास दूर होतात, अशी देखील श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर, आज आपण श्रावणातील सोमवारी केल्या जाणाऱ्या पूजेची पद्धत आणि महत्त्व नेमकं काय सांगितलं जातं? जाणून घेऊया. तसेच पहिल्या सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे. या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ. 

Read Also : Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी

श्रावणी सोमवार व्रत : 

श्रावणी सोमवार या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.

Read Also : संकेतला CWG मध्ये गोल्ड मेडलं गमवल्याचं दु:ख, पण...

श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण

श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. तसेच श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते.

अशी करावी पूजा : श्रावणी सोमवारची पूजा, परंपरेनुसार….

  • सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे
  • प्रार्थनास्थळ स्वच्छ करावं
  • उपवासाला सुरुवात करावी.
  • सकाळी आणि संध्याकाळी शंकराची पूजा करावी.
  • तिळाच्या तेलाचा दिवा लावून शंकराला फुलं अर्पण करावीत.
  • भगवान शंकराच्या मंत्रांचा जप आणि शनि चालीसेचं पठण करावं
  • शिवलिंगाला जलाभिषेक करा आणि सुपारी, पंच अमृत, नारळ आणि बेल पानं अर्पण करावीत
  • श्रावण व्रताची कथा वाचावी
  • शंकराची आरती करून प्रसाद घ्यावा
  • पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा.

सोमवार व्रत पद्धत 2 : 

आणखी एका वेगळ्या प्रकारे सोमवार व्रत केले जाते. हे व्रत श्रावणाप्रमाणेच चैत्र, वैशाख, कार्तिक आणि मार्गशीर्ष ह्या महिन्यांमध्येही केले जाते. मात्र श्रावणातील सोमवारी केल्यास ते विशेष मानले जाते. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. तत्पश्र्चात’ओम नम: शिवाय’ ह्या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ‘ओम नम: शिवाय:’ या मंत्रोच्चारासह पार्वतीमातेची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. ह्या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशातऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे. श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी