Shri Satyanarayan Vrat Katha in marathi: सत्यनारायणाची कथा; पूजा विधी, महत्त्व आणि कथागीत

Shri Satyanarayan Vrat Katha in marathi: सत्यनारायणाच्या पूजेला एक वेगळे महत्त्व आहे. श्री सत्य नारायणाची पूजा नेमकी कधी करावी, पूजा विधी आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या...

Shri Satyanarayan Vrat Katha in marathi
Shri Satyanarayan Vrat Katha in marathi: सत्यनारायणाची कथा; पूजा विधी, महत्त्व आणि कथागीत 

Satyanarayan Katha Marathi Mahiti Katha pdf: हिंदू धर्मात भगवान सत्यनारायणाचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूच्या विविध अवतारांपैकी एक भगवान सत्यनारायण मानले जातात. पंचांगानुसार प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्यात येते. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूच्या नारायण रूपाची पूजा करण्यात येते. सत्यनारायणाची पूजा ही पती-पत्नीने करावी. सत्यनारायणाची पूजा वर्षभरात कधीही करु शकता. मात्र, पौर्णिमा, श्रावणात, अधिकमासात सत्यनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. 

घरात मंगलकार्य, विवाह झाल्यावर सर्वचजण सत्यनारायणाची पूजा करतात. पूजा करताना उपवास सुद्धा केला जातो. सकाळच्या सुमारास पूजा करण्यात येते आणि पूजा होईपर्यंत हा उपवास असतो. त्यानंतर रात्री उपवास सोडला जातो. अशी मान्यता आहे की, सत्यनारायणाची पूजा आणि व्रत केल्याने आयुश्यातील सर्व अडचणी, दारिद्र्य नष्ट होते आणि आयुष्यात सुख-शांती येते.

हे पण वाचा : आचार्य चाणक्य सांगतात, या 4 गोष्टींमुळे लक्ष्मी माता जाते दूर

(Satya Narayan Vraj Puja vidhi in Marathi) सत्यनारायण व्रत पूजा विधी

सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. त्यानंतर चौरंगावर भगवान सत्यनारायणाची प्रतिमा, फोटो स्थापना करा. चौरंगाच्या चारही बाजूला केळीची पाने बांधा. पंचांगासाठी पंचामृत तयार करा. यासोबतच कलशात पाणी भरा आणि तूपाने दीवा लावा. यानंतर भगवान सत्यनारायणाच्या प्रतिमेला चंदनाने टिळा लावा. मग प्रतिमेला हार घाला, फुले वाहा, फळे आणि इतर नैवेद्य अर्पण करा. मग विधीपूर्वक पूजा करा.

हे पण वाचा : मकरसंक्रातीला बनतोय खास योग, या राशीच्या व्यक्तींना होणार मोठा लाभ

(Importance of Satya Narayan Vraj katha in Marathi) सत्यनारायणाची व्रत-कथा महत्त्व

शास्त्रांनुसार, पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी सत्यनारायणाची व्रत कथा करण्यासोबतच विष्णू सहस्त्रनामाचे पठन करणे उत्तम मानले जाते. जे भाविक सत्यनारायणाची कथा विस्तृतपणे ऐकतात त्यांना याचे चांगले फळ प्राप्त होते. या पौराणिक कथेत भगवान विष्णू यांनी म्हटलेय की, जो व्यक्ती हे व्रत करतो त्याच्या आयुष्यातील दु:ख दूर होतात आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते.

हे पण वाचा : पांढऱ्या केसांना काळे करण्याचा घरगुती उपाय

(Satya Narayan Vraj Puja vidhi material) सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी साहित्य

सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी सत्यनारायणाचा फोटो, हळद-कुंकु, गुलाल, तुळशीची पाने, विड्याची पाने, हार, फुले, नारळ, सुपाऱ्या, खारीक, बदाम, खोबऱ्याचा तुकडा, गुळाचा खडा, खडीसाखर, कापडाचे दोन पीस, पंचामृत, शंख, घंटा, अत्तर, केळीची पाने, केळी, ताम्हण, चौरंग, पाट, 5 फळे, बाळकृष्णाची मूर्ती.

हे पण वाचा : तुमचं बाळ कमी बोलतंय? जाणून घ्या कारण....

खाली देण्यात आलेल्या नावांचा उच्चार केल्यावर पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करा. त्यानंतर पळीने उजव्या हातावर पाणी घेत ताम्हनात सोडा. 

ॐ केशवाय नम: ।
ॐ नारायणाय नम: ।
ॐ माधवाय नम: ।
ॐ गोविंदाय नम: ।
ॐ विष्णवे नम: ।
ॐ मधुसूदनाय नम: ।
ॐ त्रिविक्रमाय नम: ।
ॐ वामनाय नम: ।
ॐ श्रीधराय नम: ।
ॐ ह्रषीकेशाय नम: ।
ॐ पद्मनाभाय नम: ।
ॐ दामोदराय नम: ।
ॐ संकर्षणाय नम: ।
ॐ वासुदेवाय नम: ।
ॐ प्रद्युम्नाय नम: ।
ॐ अनिरुद्धाय नम: ।
ॐ पुरुषोत्तमाय नम: ।
ॐ अधोक्षजाय नम: ।
ॐ नारसिंहाय नम: ।
ॐ अच्युताय नम: ।
ॐ जनार्दनाय नम: ।
ॐ उपेन्द्राय नम: ।
ॐ हरये नम: ।
ॐ श्रीकृष्णाय नम: ।
प्रणवस्य परब्रह्म ऋषि: ।
परमात्मा देवता दैवी गायत्री च्छंद: ।
प्राणायामे विनियोगे: ।
ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह:
ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम्।
ॐ तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो न: प्रचोदयात्।
ॐ आपो ज्योति: रसोमृतं ब्रह्म भुर्भुव: स्वरोम्।
धियो यो न: प्रचोदयात्।
ॐ आपो ज्योति: रसोमृतं ब्रह्म भूर्भुव: स्वरोम्।

(Satya Narayanachi Katha lyrics in marathi) ऐका सत्यनारायणाची कथा... सत्य नारायणाची कथागीत मराठीत

श्रीहरी जगद्पिता
दूर करी तो व्यथा
ऐका सत्यनारायणाची कथा

ही ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा

उल्का मूक राजा होता महा थोर
तयाची पत्नी होती सुंदर
नदी किनारी एक दात्यांनी
घातली महा पूजा दोघांनी

आली एक नौका त्याच मार्गानी
नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी
होती व्यापारी साधु वाण्याची
रीत पाहण्यास आला पूजनाची

उल्का मूक त्यास बोले ऐकावे
व्रत नारायणाचे अचरावे
मनो इच्छित फल मागावे
चरणी श्रीहरी च्या लागावे

घराशी आला वाणी परतून
तयाची पत्नी होती शीलवान
तयास नव्हते काही संतान
केला नवस म्हणून वाण्यान

पति पत्नी ला जाहली जाण
कन्या ही झाली त्यास रूपवान
कलावती म्हणून कन्येचे
नाव ठेविले त्याने आवडीचे

योगियांची ही प्रथा
जाई ना कधी वृथा
जाई ना कधी वृथा

ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा

लीलावती ने काही दिवासांन
दिली नवसाची त्यास आठवण
बोल पत्नीचे ऐसे ऐकून
दिल उत्तर साधु वाण्यान

लग्न कन्येचे होता मानान
करिन पूजा मोठ्या थाटान
दूत कांचन नगरी धाड़ीला
वर एक वैश्य पुत्र ठरविला

केले हो कन्यादान बापांन
विवाह पार पड़ला थाटान
व्रत नवसाचे गेला विसरुन
म्हणून वृष्ट झाले भगवान

जावया सह आला तो वाणी
करण्या धंदा आपला मानानी
नगर ते होते चंद्र केतु चे
इथेच ग्रह फिरले दोघांचे

चंद्र केतूच्या महा लातून
चोराने द्रव्य नेले चोरुन
राज दुताने पाहिली चोरी
आला तो चोर वाण्याच्या दारी

चोरीचे द्रव्य तेथे टाकून
पळाला चोर दूत पाहुन
साधू वाण्यावरी आला आळ
केले दोघांसी कैद तात्काळ

कर्ता आणि करविता
काय घडवितो आता
काय घडवितो आता

ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा

लीलावतीस दुःख बहु झाले
घरी ही द्रव्य चोरीस गेले
लागल्या मागु दोघी ही भिक्षा
पूजा ना केल्याचीच ही शिक्षा

होते ब्राम्हणा घरी पूजन
आली कलावती ते पाहून
घरी सांगून तिने मातेला
घातली पूजा त्याच वेळेला

चंद्र केतूच्या तेव्हा स्वप्नात
देव जाऊन देती दृष्टांत
दोघे निर्दोष असती व्यापारी
सोडुनी द्यावे त्यांना सत्वरी

सूटता कैदेतून तो वाणी
निघे भरून नौका द्रव्यानी
जाहली इच्छा तोच देवाची
परीक्षा घेण्या साधू वाण्याची

येऊ नी त्यास म्हणती भगवंत
ठेविले काय आहे नौकेत
म्हणे तो नौका माझी तरलेली
वेली व पाणी याने भरलेली

होवो खरे तुझे ते बोलून
यति ते दूर बसले जाऊन
द्रव्य गेले व पाने पाहिली
क्षमा यति ची त्याने मागितली

वेली पानाचे द्रव्य बनवून
दिले यति ने त्यास परतून
बांधवा संगे साधू वाण्यांन
केले नारायणाचे पूजन

ठेव हृदयी सत्यता
श्रीहरी शी पूजिता
श्रीहरी शी पूजिता

ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा

आला तो वाणी आपुल्या नगरात
जावई राहिला तो नौकेत
बातमी ऐकूनी आनंदाची
हर्षली भार्या साधु वाण्याची

गेली लीलावती ती चटकन
पति चे घ्यावयास दर्शन
घरी कलावतीने भक्तीन
केले नारायणाचे पूजन

नाही केला प्रसाद भक्षण
तशीच गेली घेण्या दर्शन
म्हणूनी वृष्ट झाले भगवान
दिली नौका नदीत बुडवून

आकाशवाणी ती पड़े कानी
आली कन्या प्रसाद त्यागुनी
तीचा पति मिळेल परतुनि
जर येईल प्रसाद भक्षुनी

घरी कलावतीने जाऊन
आली त्वरे प्रसाद भक्षुन
पति सह नौका पडली दृष्टीस
घातली पूजा हर्ष सर्वास

श्री प्रसाद भक्षिता
लाभे सौख्य सर्वथा
लाभे सौख्य सर्वथा

ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी