Shri Swami Samarth Prakat Din : अक्कलकोट स्वामी प्रकट दिन, जाणून घ्या श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा

Shri Swami Samarth Prakat Din, Shri Swami Samarth Appearance Day : श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात. त्यांनी महाराष्ट्रात  अक्कलकोट येथे दीर्घ काळ वास्तव्य केले होते.

Shri Swami Samarth Prakat Din
अक्कलकोट स्वामी प्रकट दिन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जाणून घ्या श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा
  • श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले
  • स्वामींनी अक्कलकोट येथे दीर्घ काळ वास्तव्य केले

Shri Swami Samarth Prakat Din, Shri Swami Samarth Appearance Day : श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात. त्यांनी महाराष्ट्रात  अक्कलकोट येथे दीर्घ काळ वास्तव्य केले होते. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणून ओळखले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले.

"मी नृसिंह भान असून श्री शैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. श्री स्वामी समर्थ हे श्री शैलम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर पुढील जीवनात श्री स्वामी समर्थ यांनी देशभर भ्रमण केले. 

मंगळवेढा येथून अक्कलकोट येथे पोहोचल्यानंतर श्री स्वामी समर्थ यांनी सर्वात आधी गावातील खंडोबाच्या मंदिरात मुक्काम केला. हा दिवस होता रविवार 6 एप्रिल 1856, चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे.

महाराष्ट्रात 1875 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे होते. या अशा वातावरणात क्रांतिकारक  वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. स्वामींना फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिला. 

अक्कलकोट येथे असताना स्वामींनी अनेक भक्तांवर कृपा केली. स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे... असे सांगितले. 

असे सांगतात की, 1459 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. यानंतर ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनात अदृश्य झाले. याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी एक लाकूडतोड्या वनात आला. लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली. यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. थोड्याच वेळात वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली. हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. स्वामींनी लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले. 

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी     शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. नंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली. पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपविल्याचे नाटक केले. प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. 

उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे

उन्हाळ्यात या भाज्या खाणे आरोग्यासाठी फायद्याचे

पुण्यतिथी

श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार 30 एप्रिल 1878 रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके 1800, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' मध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केल्याचे नाटक केले. नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. 

पांढरा कांदा खाण्याचे फायदे

कांदा दीर्घकाळ सुरक्षित साठवण्याच्या TIPS

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी