‘या’ तीन राशींना चांदीचा होतो मोठा फायदा; वाचा चांदी वापरण्याविषयीचे नियम

आध्यात्म
भरत जाधव
Updated Apr 09, 2021 | 23:16 IST

ज्योतिषांच्या मते, सर्व धातूंवर ग्रहाचे शुभ आणि अशुभ प्रभाव असतो. सोने ज्याप्रकारे गुरुची धातू माता जाता है त्याचप्रकारे चांदीवर चंद्राचा प्रभाव असतो.

silver usefull to these three zodiac sign  know the silver rule for use
‘या’ तीन राशींना चांदीचा होतो मोठा फायदा  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • मेष, धनु,आणि सिंह या राशींच्या लोकांना चांदी वापरू नये
  • चांदीच्या वापराने प्रेम जीवनात येत यश
  • घरात चांदीचे वस्तुंचा वापर केल्यास शुक्र ग्रह प्रसन्न होतो.

नवी दिल्ली : ज्योतिषांच्या मते, सर्व धातूंवर ग्रहाचे शुभ आणि अशुभ प्रभाव असतो. सोने ज्याप्रकारे गुरुचे धातू मानले जाते, त्याचप्रकारे चांदीवर चंद्राचा प्रभाव असतो. पण राशीचक्रातील ३ राशींना चांदीचे आभूषण घालण्यास मनाई करण्यात आली आहे. मेष, धनु आणि सिंह या तीन राशी अग्नी तत्वाच्या असल्याने या राशींना चांदी घालण्यास मनाई आहे. यामुळे जे अग्नी तत्वाशी संबंधित असतात यामुळे या राशीच्या लोकांनी चांदी वापरू नये, महिलांनी दागिने वापरू नये. ज्योतिषांच्या मते, चंद्राचा संबंध हा पाणी या तत्वाशी असतो. यामुळे पाणीच्या विरुद्धात असलेल्या अग्नीचे तत्व असलेल्यांनी चांदी वापरू नये. दरम्यान आज आम्ही या लेखात चांदीविषयी माहिती देणार आहोत. चांदी घातल्यानंतर काय आणि कोणाला फायदा होतो याची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

मेष राशीसाठी काय आहे चांदीचे महत्त्व

ज्योतिषांच्या मते, चंद्र मेष राशीत सुखेश म्हणजे कुंडलीच्या पंचम भावाचा स्वामी असतो. मोतीला चांदीसह वापरणाऱ्यांना प्रेम जीवन, शिक्षण, भौतिक सुखाची प्राप्ती होते. यासह एका गोष्ट लक्षात ठेवा, चांदीसोबत सोन्याशिवाय कोणताच धातू मिश्रित करू नका.

या राशींसाठी शूभ आहे चांदी

चांदीचे दागिने कर्क, वृश्विचक आणि मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असते. या राशींना जल तत्वाचे मानले जाते आणि चांदी पण जल तत्वाची असल्याने या राशीच्या लोकांसाठी शुभ मानली जाते. मेष, सिंह, आणि धनुसाठी चांदी शुभ मानली जात नाही.

चांदीच्या प्रयोगाने शुक्र होतो मजबूत

ज्योतिषांच्या मतानुसार, चांदीचा वापर केल्याने शुक्र मजबूत होतो. घरात चांदीचे वस्तुंचा वापर केल्यास शुक्र ग्रह प्रसन्न होत असतो आणि दांपत्य जीवनात मधुरता येत असते. लहान मुलांच्या गळ्यात चांदीचा चंद्र घातल्यास सर्दी आणि खोकला या त्रासापासून ते दूर राहतात. यासह ज्या लोकांना हार्मोंसची काही समस्या असेल त्यांनी  चांदीचा वापर करावा यामुळे त्यांची समस्या दूर होईल.

महादेवाची उपासना

चांदीचा उपयोग हा फक्त ग्रहदशा सुधारण्यासाठी नाहीतर भगवान शंकराच्या पूजेसाठीही केला जातो. चांदीची निर्मिती महादेवाच्या डोळ्यातून झाली आहे. काहींची अशी धारणा आहे की, सोमवारी जर महादेवाला चांदीच्या तांब्याने पाणी वाहिल्यास आणि पंचामृताने त्यांचं अभिषेक केलं तर देवाचे देव महादेव प्रसन्न होतात. अविवाहित पुरुषांनी दर सोमवारी असं केलं तर त्यांना लवकर वधू मिळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी