सोपे उपाय करा; पैसे, नोकरी, कुटुंबाशी संबंधित समस्या सुटताना बघा

simple measures for solve money, job, family related problem : निवडक सोप्या उपायांमुळे नागरिकांना त्यांचे पैसे, नोकरी, कुटुंबाशी संबंधित प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होऊ शकते. जाणून घ्या ज्योतिषशास्त्राने सांगितलेले सोपे उपाय...

simple measures for solve money, job, family related problem
सोपे उपाय करा; पैसे, नोकरी, कुटुंबाशी संबंधित समस्या सुटताना बघा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सोपे उपाय करा; पैसे, नोकरी, कुटुंबाशी संबंधित समस्या सुटताना बघा
  • ज्योतिषशास्त्राने सांगितलेले सोपे उपाय...
  • पैसे, नोकरी, कुटुंबाशी संबंधित प्रश्न सोडविण्यास सहाय्यक ठरतील असे उपाय

कमी जास्त प्रमाणात अनेकांना पैसे, नोकरी, कुटुंब यांच्याशी संबंधित प्रश्न भेडसावत असतात. हे प्रश्न सोडवावे कसे हे काहींच्या लक्षात येत नाही तर काही जण या प्रश्नांनीच त्रस्त असतात. या अशा त्रस्त नागरिकांच्या अडचणी दूर होणे शक्य आहे. या समस्या सोडवण्यासाठी काही सोपे उपाय करणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्राने या उपायांची माहिती दिली आहे. ज्यांचा विश्वास आहे ते नागरिक ज्योतिषशास्त्रानुसार हे सोपे उपाय करू शकतात. या उपायांमुळे नागरिकांना त्यांचे पैसे, नोकरी, कुटुंबाशी संबंधित प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होऊ शकते. जाणून घ्या ज्योतिषशास्त्राने सांगितलेले सोपे उपाय...

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. हाताचे तळवे : सकाळी उठल्यावर दोन्ही हातांच्या तळव्यांकडे बघा. देवाचे मनात नामस्मरण करा. हाताच्या तळव्याच्या वरील भागात लक्ष्मी, तळव्याच्या मधोमध सरस्वती आणि तळव्याच्या खालच्या भागात भगवान विष्णू यांचे स्थान आहे, असे ज्योतिषशास्त्र सांगते. याच कारणामुळे हाताच्या तळव्यांकडे बघून मनात देवाचे नामस्मरण करावे असे ज्योतिषशास्त्र सांगते
  2. नोकरी : दर शनिवारी मंदिरात जाऊन शनि देवाचे दर्शन घ्यावे. शनि देवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा तेवत ठेवावा. शनि मंत्राचे पठण करावे. व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी व्यापार वृद्धि यंत्र स्थापन करावे आणि दररोज त्याच दर्शन घ्यावे. या उपायांनी आर्थिक प्रश्न सुटण्यास तसेच नोकरीचा प्रश्न सुटण्यास मदत होते असे ज्योतिषशास्त्र सांगते
  3. कुटुंब : कुटुंबात आनंदाचे सलोख्याचे वातावरण राहावे, घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा यासाठी बादलीत पाणी घ्या आणि त्या पाण्यात मीठ घाला. या मीठ मिश्रीत पाण्याने संपूर्ण घराची लादी (फरशी/जमीन) पुसून घ्या असे ज्योतिषशास्त्र सांगते
  4. रामेश्वरम यात्रा : बाळ व्हावे यासाठी दांपत्याने रामेश्वरम यात्रा करावी आणि तिथे जाऊन सर्प पूजन करावे, पितरांचे पूजन करावे असे ज्योतिषशास्त्र सांगते
  5. आर्थिक प्रश्न : आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मुंग्यांना साखर अथवा साखर मिश्रीत धान्याचे पीठ खाऊ घालावे असे ज्योतिषशास्त्र सांगते

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी