Simple remedies to get blessing of maruti or hanuman on tuesday, mangalwar hanuman upay, mangalwar maruti upay, mangalwar upay : शनि पीडेने त्रस्त असलेल्यांनी तसेच ज्यांना ज्योतिषाने मारुतीरायाला (हनुमान) प्रसन्न करण्यासाठी उपाय करण्याचा सल्ला दिला आहे त्यांनी मंगळवारी निवडक उपाय करावे असे ज्योतिषशास्त्र सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार हा दिवस राम भक्त हनुमानाचा अर्थात मारुतीरायाचा दिवस आहे. या दिवशी मारुतीचे मनोभावे पूजन केल्यास तो प्रसन्न होतो. मारुतीचा आशीर्वाद लाभल्यास शनि पीडेचा त्रास कमी होण्यास, अडचणी दूर होण्यास, अडचणींमधून मार्ग सापडण्यास मदत होते. सकारात्मक ऊर्जा वाढते. नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते. आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होते.
धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय