Makar Sankranti: मकर संक्रांतीला या ६ ठिकाणी स्नान केलं तर मिळतं अक्षय पुण्य

आध्यात्म
Updated Jan 13, 2020 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

मकर संक्रातीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं खूप महत्त्व असतं. यापेक्षाही अधिक महत्त्व पवित्र स्थानावर असलेल्या नदीत स्नान करण्याचं असतं. जाणून घ्या संक्रातीच्या शुभमुहूर्तावर कुठे स्नान केलं तर मिळेल पुण्य

Makar Sankranti
मकर संक्रांतीला या ६ ठिकाणी स्नान केलं तर मिळतं अक्षय पुण्य  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • मकर संक्रांतीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं महत्त्व
  • देशात ६ ठिकाणी नदीत स्नान केल्यानं होते पुण्यप्राप्ती
  • तर या स्थानांवर नदीत स्नान केल्यानं होते मोक्ष प्राप्ती आणि पापांमधून होते मुक्तता

मकत संक्रांतीला दान करण्यासोबतच पवित्र नदीत स्नान करण्याचंही खूप महत्त्व असतं. जर हे स्नान पवित्र स्थानी म्हणजेच तिर्थस्थानी असलेल्या नदीत केलं तर त्याचं अक्षय पुण्य प्राप्त होतं. मकर संक्रातीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि यादिवशीच तीर्थस्थानावर असलेल्या पवित्र नदीत स्नान करून सूर्याची उपासना केली तर मनुष्याला खूप चांगलं फळ मिळतं आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पुराणानुसार मकर संक्रातीला या ६ ठिकाणी स्नान केल्यानं खूप पुण्य प्राप्त होतं. तर मग जाणून घेऊया हे ६ ठिकाणं कोणते आहेत ते.

गंगासागर इथं स्नान केल्यानं मिळतं अश्वमेध यज्ञाचं फळ

मकर संक्रांतीला गंगासागर इथं स्नान केल्यानं अश्वमेध यज्ञासारखं फळ मिळतं. अशी मान्यता आहे की, गंगा सागरमध्ये फक्त एकदाच डुबकी मारल्यानं दहा अश्वमेध यज्ञानं जितकं पुण्य मिळेल किंवा १ हजार गायी दान केल्यानं जे पुण्य मिळेल ते एका स्नानात मिळतं. इथं गंगा नदी समुद्राला मिळते.

 

 

प्रयागराज इथं स्नान केल्यानं मिळतो मोक्ष

मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयागराज इथं गंगेत स्नान केल्यानं खूप पुण्य मिळतं. संगमाच्या तटावर स्नान केल्यास मोक्षाची प्राप्ती होते. एक महिन्यापर्यंत जर संगम तटावर कल्पवास केला तर याचं अधिक पुण्य मिळतं.

 

 

हरिद्वारमध्ये स्नान केल्यानं धुतली जातात सर्व पाप

हरिद्वार इथं गंगेत स्नान करणं तसंच खूप पुण्य प्राप्त करून देणारं आहे. मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी इथं स्नान केल्यानं आपली सर्व पापांमधून मुक्तता होते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Great Ganga . . . . Reposted from @grinenko_yoga . #Rishikesh#yogatour#indiayoga#greenyogavl#gangaji

A post shared by Banjaara Valley (@banjaaravalley) on

 

ऋषिकेशमध्ये स्नान केल्यानं मिळते आत्मशांती

ऋषिकेशमध्ये मकर संक्रातीच्या दिवशी स्नान केल्यानं व्यक्तीला आत्मशांतीचा अनुभव मिळतो. आजुबाजूला पर्वतरांगा आणि मनमोहक दृश्य अशा वातावरणात गंगेत स्नान केल्यानं मन:शांती मिळते आणि मेंदूलाही शांतता लाभते.

 

 

वाराणसीमध्येही मिळतो मोक्ष

बाबा भोलेनाथाची नगरी असलेल्या वाराणसी इथं मकर संक्रातीच्या दिवशी गंगेत स्नान केल्यानं मोक्ष प्राप्त होतो. काशीला गंगा स्नान केलं तर इथंच नाही तर मृत्यूनंतरही पुण्य प्राप्त होतं.

सुल्तानगंज इथं स्नान केल्यानं पापातून होते मुक्तता

बिहारच्या सुल्तानगंज इथं मकर संक्रातीला स्नान करणं खूप पुण्य प्राप्त करून देणारं असतं. असं मानलं जातं की, मकर संक्रांतीला इथं स्नान केल्यानं अनेक जन्मांच्या पापातून आपली मुक्तता होते.

तर मग मकर संक्रांतीला आपण या ६ ठिकाणी स्नान करून आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करून घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी