Som Pradosh Vrat 2023 time pujavidhi shubh muhurat or shubh muhurta significance : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार आज (सोमवार 17 एप्रिल 2023) 3 वाजून 46 मिनिटांनी सोम प्रदोष व्रत सुरू झाले आहे. या व्रताचा समारोप उद्या (मंगळवार 18 एप्रिल 2023) 1 वाजून 27 मिनिटांनी होईल. तिथी उदय आज (सोमवार 17 एप्रिल 2023) असल्यामुळे सोम प्रदोष व्रताचे सर्व विधी आजच करणे योग्य होईल.
सोम प्रदोष व्रत असल्यामुळे आज (सोमवार 17 एप्रिल 2023) संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटे ते रात्री 9 वाजून 1 मिनिट या कालावधीत संध्याकाळची शंकराची पूजा करणे हिताचे.
सोम प्रदोष व्रत योग्य प्रकारे केले तर भगवान शंकर आणि चंद्र देव प्रसन्न होतात. अडीअडचणी, अडथळे दूर होण्यास मदत होते. प्रगती होते. संसार सुखाचा होतो. कौटुंबिक वातावरण आनंदी होते; असे सांगतात. यासाठीच सोम प्रदोष व्रत महत्त्वाचे आहे.
सोम प्रदोष व्रताच्या काळात सूर्योदय झाल्यानंतर भगवान शंकराची तर संध्याकाळी चंद्र देवाची पूजा केली जाते. दोन्ही वेळा पूजा करण्यासाठी आंघोळ करून धूतवस्त्र अथवा सोवळे नेसावे. नंतर पूजा करावी. भगवान शंकराला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करावा. यानंतर भगवान शंकराला पांढरी फुले आणि बेलपत्र अर्थात बेलाची पाने अर्पण करावी. यानंतर शंकराची धूप लावून पूजा करावी. संध्याकाळी चंद्राकडे बघावे. चंद्राच्या दिशेने बघून जलाभिषेक करावा तसेच चंद्र देवाला फुले आणि अक्षता वाहाव्या. चंद्र देवाला हळद कुंकू वाहावे. यानंतर चंद्र देवाला ओवाळावे.
सोमवारी या चुका टाळा नाहीतर होईल मोठे नुकसान
शंकराला प्रसन्न करून आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी करा हे उपाय
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ 1 ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव ॥ 2 ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव ॥ 3 ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव ॥ 4 ॥
जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।
आरती ओंवाळूं पदिं ठेउनि माथा ॥ धृ. ॥
उदयीं ह्रदयीं तुझ्या सीतळतां उपजे ।
हेलावुनि क्षीराब्धि आनंदे गर्जे ॥
विकसितकुमुदिनी देखुनि मन तें बहु रंजे ।
चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥ जय. ॥ 1 ॥
विशेष महिमा तुझा न कळे कोणासी ।
त्रिभुवनि द्वादशराशी व्यापुनि आहेसी ॥
नवही ग्रहांमध्ये उत्तम तूं होसी ।
तुजें बळ वांछिती सकळहि कार्यांसी ॥ जय. ॥ 2 ॥
शंकरगणनाथादिक भूषण मिरविती ।
भाळी मौळी तुजला संतोषें धरिती ॥
संकटनामचतुर्थिस पूजन जे करिती ।
संपत्तिसंतति पावुनि भवसागर तरती ॥ जय. ॥ 3 ॥
केवळ अमृतरुप अनुपम्य वळसी ।
स्थावर जंगम यांचे जीवन आहेसी ॥
प्रकाश अवलोकितां मन हें उल्हासी ।
प्रसन्न होउनि आतां लावीं निजकासी ॥ जय. ॥ 4 ॥
सिंधूतनया इंदु बंधु श्रीयेचा ।
सुकीर्तीदायक नायक उड्डगण जो यांचा ॥
कुरंगवाहनचंद्रा अनुचित हे वाचा ।
गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ॥ जय. ॥ 5 ॥