Ganesh Chaturthi 2022 Flowers: गणपतीला बाप्पाला दररोज अर्पण करा 'हे' फूल अन् पाहा चमत्कार

Ganesh Chaturthi 2022 Flowers: देव-देवतांच्या पूजेमध्ये फुलांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे. कारण फुलं अर्पण केल्याशिवाय खऱ्या अर्थाने पूजा पूर्णच होत नाही. त्यातही आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला देखील काही खास फुलं आवडतात. जाणून घ्या त्याचविषयी.

some flower is very dear to ganpati bappa offer it everyday on ganpati establishment and see miracles
गणपतीला बाप्पाला दररोज अर्पण करा 'हे' फूल अन्... 
थोडं पण कामाचं
  • लाल आणि पिवळी रंगाची फुले गणपती बाप्पाला आहेत प्रिय
  • आवडती फुले अर्पण केल्याने गणपती बाप्पा होतो प्रसन्न
  • श्रीगणेशाला केतकीचे फूल वाहू नये

Ganpati Bappa: गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सणाला 31 ऑगस्ट 2022  सुरुवात होणार आहे. त्यामुळे आतापासूनच गणेशोत्सवाची (Ganeshostav) सगळीकडेच जोरदार तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव यंदा 31 ऑगस्टपासून सुरू होणार असून तो 9 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत (Anant Chaturdashi) असणार आहे. यावेळी गणेश चतुर्थीला घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून 10 दिवस मनोभावे पूजा केली जाते. (some flower is very dear to ganpati bappa offer it everyday on ganpati establishment and see miracles)

देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार आणि निष्ठेनुसार श्रीगणेशाची पूजा करून बाप्पाचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हालाही गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची कृपा आपल्यावर कायम राहावी असं वाटत असेल तर बाप्पाला पूजेत त्याला आवडणारी काही फुले आवर्जून अर्पण करा. गणपती बाप्पाल जसं दुर्वा, मोदक आणि लाडू आवडतात, तसेच काही फुलेही खूप आवडतात.

अधिक वाचा: Ganesh Chaturthi 2022: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' स्तोत्राचे पठण; सर्व दुःख होतील दूर, अशी करा सुरूवात

गणपती बाप्पाला अर्पण करा ही फुले ( Ganesh Chaturthi 2022 Flowers)

गणपतीला लाल आणि पिवळी फुले खूपच प्रिय आहेत. त्यामुळे बाप्पाच्या पूजेमध्ये लाल रंगाचे कोणतेही फूल अर्पण करता येते. याशिवाय श्रीगणेशाला पिवळा रंगही खूप आवडतो. गणेशाच्या पूजेत झेंडू, चाफा ही फुले अर्पण करू शकता किंवा पिवळ्या रंगाचे कोणतेही फूल गणपतीला अर्पण करू शकता. या रंगांची फुले गणेशाला प्रिय आहेत. पूजेत ही फुले अर्पण केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होऊन त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात असं मानलं जातं.

अधिक वाचा: Ganesh Chaturthi 2022 Ekdant Katha: गणपती बाप्पाला का म्हणतात एकदंत, जाणून घ्या या मागील कथा

वारानुसार गणपती बाप्पाला अर्पण करा फुले

गणेशोत्सव पूर्ण 10 दिवस असतो. अशावेळी या दहा दिवसांमध्ये तुम्ही वारानुसार बाप्पाच्या जी फुले सर्वाधिक आवडतात त्याने पूजा करू शकता. उदाहरणार्थ, मंगळवारी झेंडूची फुले, बुधवारी जास्वंदाची फुले, गुरुवारी पिवळ्या रंगाची फुले, सोमवार आणि शुक्रवारी पांढऱ्या रंगाची फुले, शनिवारी निळ्या रंगाची फुले आणि रविवारी पांढरी फुले अर्पण करता येतील.

अधिक वाचा: Hartalika HD Wishes : हरितालिकेच्या पवित्र व्रताचे मराठीतून द्या शुभेच्छापत्र

गणपती बाप्पाला 'हे' फुल अजिबात वाहू नका.

गणपती बाप्पाला जवळजवळ सर्व प्रकारची फुले अर्पण करता येतात. पण पूजेमध्ये केतकीची फुले गणेशाला अर्पण करू नयेत असे मानले जाते. कारण केतकीची फुले गणेशाचे जनक भगवान शंकराला अप्रिय आहेत. त्यामुळे गणेशाच्या पूजेत देखील ही फुले अर्पण करू नयेत असं शास्त्रात म्हटलं आहे. तसेच गणेशाला शिळी फुले कधीही अर्पण करू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते.

(टीप: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी