मुंबई : अमावस्या (Amavasya)तिथी महिन्यातून एकदा येत असते. हिंदू धर्मात (Hinduism)आमवस्येला खूप महत्त्व आहे, त्यात सोमवती आमवस्या असली तर त्याचे महत्त्व अधिक वाढत असते. सोमवारी येणार्या अमावस्या दिवसाला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्या वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते. विवाहित महिला (married woman) हे व्रत करतात. फाल्गुन (Falgun) महिन्याची अमावस्या सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी येत आहे. या दिवशी विष्णू देवाची (Lord Vishnu) विधीपूर्वक पूजा (Worship) केली जाते. (Somvati Amavasya : first Somvati Amavasya of the year, know the rituals, auspicious time and importance)
अधिक वाचा : या नैसर्गिक उपयांनी चेहऱ्यावरील केसं होतील गायब
या आमवस्येला विवाहित महिला व्रत ठेवत असतात. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्या व्रत करतात. सोमवती अमावस्या व्रताला शास्त्रात 'अश्वथ प्रदक्षिणा व्रत' असेही म्हणतात. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पणही केले जाते. या अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापांपासून मुक्ती मिळते आणि दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होत असते अशी मान्यता आहे. चला जाणून घेऊया फाल्गुन अमावस्या पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्त्व.
अधिक वाचा : या आहेत जगातील टॉप-9 महिला क्रिकेटपटू
फाल्गुन, कृष्ण अमावस्या सुरू- 04:18 दुपार, फेब्रुवारी 19
फाल्गुन, कृष्ण अमावस्या समाप्ती- दुपारी 12:35 सकाळी, फेब्रुवारी 20
धार्मिक मान्यतेनुसार, सोमवती आमवस्येचं विशेष महत्त्व आहे. या आमवस्येला पितरांचे तर्पण केलं जाते. त्यांचे विशेष आर्शीवाद आपल्याला मिळत असतात. जीवनात सुख-समुद्धी येत असते.
अधिक वाचा : दीपक चहरचे पत्नीसोबत Romantic फोटो; कोणाची नजर न लागो या जोडप्याला