Vighnaraja Sankashti Chaturthi 2022: जाणून घ्या, विघ्नराज संकष्टी चतुर्थी कधी आहे, या दिवशी जुळून येतोय खास योग

Vighnaraja Sankashti Chaturthi 2022 Shubh Muhurat: हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी विघ्नराज संकष्टी चतुर्थी 13 सप्टेंबर रोजी येत आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे. नियमानुसार गणपतीची आराधना केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. ही चतुर्थी मंगळवारी आल्याने अंगारकी योगही आहे. 

Vighnaraja Sankashti Chaturthi 2022
विघ्नराज संकष्टी चतुर्थी कधी आहे, या दिवशी जुळून येतोय खास योग 
थोडं पण कामाचं
  • यंदा विघ्नराज संकष्टी चतुर्थीचे व्रत मंगळवार, १३ सप्टेंबर रोजी
  •  या दिवशी गणपतीची विधीवत पूजा केली जाते.
  • या दिवशी प्रथम पूज्य श्रीगणेशाची पूजा केल्याने अडथळे दूर होतात

Vighnaraja Sankashti Chaturthi 2022 Date Time: विघ्नराज संकष्टी चतुर्थीचे व्रत अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाईल. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी विघ्नराज संकष्टी चतुर्थीचे व्रत मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी नियमानुसार गणेशाची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी प्रथम गणेशाची पूजा केल्याने बाधा दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अत्यंत शुभ चार योग तयार होत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार या योगामध्ये गणेशाची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. या चार योगांबद्दल आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया.

अधिक वाचा : September Honeymoon या महिन्यात मधूचंद्रासाठी कुठे जाणार

विघ्नराज संकष्टी चतुर्थी 2022 मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10:37 वाजता सुरू होईल आणि बुधवारी, 14 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10:23 वाजता समाप्त होईल. दुसरीकडे विघ्नराज संकष्टी चतुर्थीचे व्रत 13 सप्टेंबरला ठेवण्यात येणार आहे.

अधिक वाचा : या सवयींमुळे बिघडते झोप


विघ्नराज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे योग 

ज्योतिषशास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चार योग तयार होत आहेत. वृद्धी योग, ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग. वृद्धी योग सकाळी 07:37 पर्यंत असून त्यानंतर ध्रुव योग होईल. याशिवाय या दिवशी सकाळी 06.36 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06.05 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग देखील आहे. हा योग अतिशय शुभ योग आहे. या योगांमध्ये गणेशाची आराधना केल्याने सर्व बाधा दूर होतात.

अधिक वाचा :  नोकरीच्या ठिकाणी कधीही करू नका 'हे' खुलासे, होईल पश्चाताप

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गणपतीला मोदक आणि दुर्वा अर्पण केल्यास विशेष फळ मिळते. या दिवशी उपवासालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी रात्री चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन आणि पूजा केल्यानंतरच उपवास मोडला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी