Shani Amavasya 2019: शनी अमावस्येच्या दिवशी करा हे उपाय, मिळेल केतू आणि शनि पीडेपासून मुक्ती

आध्यात्म
Updated May 04, 2019 | 16:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

शनी अमावस्येच्या दिवशी दान आणि पुण्य कर्म केलं पाहिजे. असं केल्याने आपले पितृ दोष हे दूर होतात. शनी ही न्याय देवता आहे असं म्हटलं जातं. शनी देव साडेसातीमध्ये माणसाच्या कर्माची चांगली वाईट फळं त्याला देतो.

shani_instagram
शनी अमावस्येच्या दिवशी करा हे उपाय  |  फोटो सौजन्य: Instagram

शनी देव हे सूर्य पुत्र आणि यमराजाचे भाऊ आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं की, शनी अमावस्येच्या दिवशी दान आणि पुण्य कर्म केलं पाहिजे. असं केल्याने आपले पितृ दोष नष्ट होतात असं म्हटलं जातं. शनी म्हणजे साडेसाती हे आपल्याला ठाऊक आहेच. कारण शनी देव ही न्यायदेवता म्हणून देखील ओळखली जाते. त्यामुळे साडेसातीमध्ये शनी देव हे प्रत्येकाच्या कर्मानुसार चांगले, वाईट फळं देत असतात. 

शनी अमावस्येच्या दिवशी जर मनोभावे पूजा केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. पण त्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय नक्की लक्षात ठेवा. शनी अमावस्येचा दिवशी काही उपाय करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला त्या पुजेचा नक्की लाभ मिळू शकतो. 

शनी अमावस्येच्या दिवशी करा हे उपाय, दूर होतील पितृ दोष

  1. शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा न विसरता लावा. 
  2. शनी अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाच्या गायीची पूजा करा. तिला ८ बुंदीचे लाडू खाण्यास द्या. त्यानंतर तिची परिक्रमा पूर्ण करा.
  3. या दिवशी पिंपळाच्या झाडाची परिक्रमा करा. तसेच शनी मंदिरात जाऊन काळ्या चण्यांचा प्रसाद वाटा 
  4. या दिवशी शनी मंदिरात जाऊन उडद डाळीचं दान करावं. 
  5. शनी अमावस्येच्या दिवशी ११ नारळ, काळे आणि पांढरे तीळ, ८ मूठ कोळसा, जवस, काळे चणे हे सगळं एका काळ्या कपड्यात बांधून शनी देवाचं स्मरण करुन ते नदीमध्ये सोडून द्यावं. 
  6. असं म्हटलं जातं की, शनिवार अमावस्येच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने केतू आणि शनी पीडेपासून मुक्ती मिळते. तसेच घरात सुख, समृद्धी नांदते. 
  7. ज्यांच्या कुंडलीमध्ये अर्ध काल सर्प योग असतो किंवा पूर्ण काल सर्प योग असतो त्यांना यामधून मुक्त होण्यासाठी या दिवशी पूजा करणं गरजेचं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी