Surya Grahan 2022: दिवाळीच्या पुढील दिवशी लागतेय वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण, या ४ राशींवर मोठे संकट

आध्यात्म
Updated Sep 23, 2022 | 16:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Surya Grahan on zodiac sign: या वर्षाचे शेवटचे सूर्य ग्रहण पुढील महिन्यात २५ ऑक्टोबरला लागत आहे. त्या दिवशी गोवर्धन पुजाही असणार आहे. यामुळे ४ राशींवर मोठे संकट आहे. त्यापासून बचावासाठी आतापासून उपाय करण्याची गरज आहे. 

solar eclipse
दिवाळीच्या पुढील दिवशी सूर्य ग्रहण, या ४ राशींवर मोठे संकट 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार सूतक काळ सूर्य ग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी लागतो.
  • दरम्यान यावेळेस सूर्य ग्रहण २५ ऑक्टोबरला दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी सुरू होईल.
  • यामुळे सूतक काळ दिवाळीची रात्री २ वाजून ३० मिनिटांपासून लागेल.

मुंबई: देशातील सगळ्यात मोठा उत्सव दिवाळीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यावेळेस दिवाळी २४ ऑक्टोबरला साजरी केली जात आहे. त्याच्या पुढील दिवशी २५ ऑक्टोबरला गोवर्धन पुजा असेल. या दिवशी वर्षातील अखेरचे सूर्य ग्रहण असेल. या ग्रहणादरम्यान सूर्य तूळ राशीत असेल. ही त्याची नीच राशी मानली जाते. दिवाळीनिमित्त असणाऱ्या सूर्य ग्रहणाचा परिणाम खरंतर सर्व १२ राशींवर होणार आहे. मात्र ४ राशीच्या लोकांना विशेष सावध राहावे लागेल. जाणून घ्या कोणत्या आहेत या ४ राशी...sun eclipse after divali day, effect on this 4 zodiac sign

अधिक वाचा - सोलापुरात प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीचा खून

कन्या रास

सूर्य ग्रहणादरम्यान कामधंदा मंद पडू शकतो. या दरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नका. यामुळे नुकसान सोसावे लागू शकते. आर्थिक क्षेत्राशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका. पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. कोणाला उधारीवर दिलेले पैसे डुबू शकतात. 

वृषभ रास

व्यापारात नुकसान होऊ शकते. दुकानात ठेवलेले सामना खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे जास्त माल खरेदी करू नका. ग्रहणादरम्यान गुंतवणूक करू नका. आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहा. अशी कोणतीही गोष्ट खाऊ नका जी आपल्या आरोग्यास नुकसान पोहोचवू शकते. 

तूळ रास 

सूर्य ग्रहण तुमच्यासाठी अशुभ असेल. तुमच्यासोबत दुर्घटनाचे योग बनणार. यासाठी कोणतेही वाहन चालवताना सतर्कता बाळगा. तुमच्यावर शनीची ढय्या असेल. नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून घाबरून राहाल. मानसिक तणावाचा त्रास जाणवेल. 

मिथुन रास

ग्रहणादरम्यान महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. वैवाहिक संबंधात तणाव येऊ शकतो. कुटुंबात गृह क्लेश वाढेल. कुटुंबात फालतू खर्च वाढतील. यामुळे घराचे बजेट बिघडू शकते. तसेच कोणतेही बिझनेस डील अचानक कॅन्सल होऊ शकते. 

अधिक वाचा - अपहरण केलेल्या मुलीला घरी सोडताच अपरहणकर्त्याचा गेला जीव

सूर्य ग्रहण २०२२मध्ये कधीपासून सूतक काळ

ज्योतिषशास्त्रानुसार सूतक काळ सूर्य ग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी लागतो. दरम्यान यावेळेस सूर्य ग्रहण २५ ऑक्टोबरला दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी सुरू होईल. यामुळे सूतक काळ दिवाळीची रात्री २ वाजून ३० मिनिटांपासून लागेल. यावेळेस सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही यामुळे सूतक काळ मान्य नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी