Surya Dev Puja : रविवारी पूजा करून करा सूर्यदेवाला प्रसन्न; अडचणीत मार्ग निघेल, शत्रूवर मात करू शकाल

Surya Dev Puja On Sunday : स्वयंप्रकाश आणि ऊर्जा यांच्या जोरावर सूर्यमालेतील ग्रहांना स्वतःभोवती फिरता ठेवणारा सूर्य अर्थात भारतीय ज्योतिषशास्त्रातील सूर्य किंवा सूर्यदेव.

Surya Dev Puja On Sunday
Surya Dev Puja : रविवारी पूजा करून करा सूर्यदेवाला प्रसन्न; अडचणीत मार्ग निघेल, शत्रूवर मात करू शकाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Surya Dev Puja : रविवारी पूजा करून करा सूर्यदेवाला प्रसन्न; अडचणीत मार्ग निघेल, शत्रूवर मात करू शकाल
  • सूर्यदेवाच्या कृपेने सुख समृद्धी येते
  • कशी करावी सूर्यदेवाची पूजा?

Surya Dev Puja On Sunday : स्वयंप्रकाश आणि ऊर्जा यांच्या जोरावर सूर्यमालेतील ग्रहांना स्वतःभोवती फिरता ठेवणारा सूर्य अर्थात भारतीय ज्योतिषशास्त्रातील सूर्य किंवा सूर्यदेव. या सूर्याला दररोज सकाळी आंघोळ करून नमस्कार करा. रविवारच्या दिवशी ब्रम्ह मुहुर्तावर (सूर्योदयाच्या दीड ते पावणे दोन तास आधीची वेळ) आंघोळ करा आणि सूर्यदेवाची मनोभावे पूजा करावी. सूर्यदेवाला जलाभिषेक करा. याने सूर्यदेव प्रसन्न होतात. सूर्याची कृपा होते. 

सूर्यदेवाच्या कृपेने सुख समृद्धी येते. प्रगती होते. अडचणी दूर होतात. शत्रूवर मात करण्याची क्षमता प्राप्त होते. शरीर आणि मन सकारात्मक उर्जेने प्रेरित होते. कामं करण्यासाठी नवा उत्साह संचारतो. 

कशी करावी सूर्यदेवाची पूजा?

रविवारच्या दिवशी ब्रम्ह मुहुर्तावर (सूर्योदयाच्या दीड ते पावणे दोन तास आधीची वेळ) आंघोळ करा. नंतर हातात तांब्याचे ताम्हन घ्या. या ताम्हनात कुंकू, रक्तचंदन, लाल रंगाची फुले ठेवा. आता सूर्यदेवाकडे बघून त्याला कुंकू, रक्तचंदन आणि लाल रंगाची फुले वाहा. ताम्हनात दिवा प्रज्वलीत करून सूर्यदेवाची आरती करा. नंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. पाण्यात रक्तचंदन मिसळा. वरून थोडे तांदूळ आणि लाल रंगाचे फुल ठेवा. आता सूर्यदेवाकडे बघा. सूर्याला नमस्कार करा.  सूर्याला जलाभिषेक करा. पूजा सुरू असताना तसेच सूर्याला जलाभिषेक करतात सतत ओम सूर्याय नम: असे सतत म्हणावे. तसेच दररोज सूर्योदयाच्या सुमारास उठून सूर्याला नमस्कार करा. यामुळे सूर्याची कृपा होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी