Surya Grahan 2021: भारतात या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी, कुठे आणि कसे पहावे

solar eclipse 2021: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण सकाळी 10:59 वाजता सुरू होईल आणि 4 डिसेंबर रोजी दुपारी 3:07 पर्यंत चालेल, या दिवशी शनिवार आहे.

surya grahan 2021 here when where and how to watch last solar eclipse of this year on 4 december saturday
भारतात या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी, कुठे आणि कसे पहावे 
थोडं पण कामाचं
  • 2021 चे शेवटचे सूर्यग्रहण, या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण 4 डिसेंबर (शनिवार) रोजी होणार आहे.
  • जेव्हा चंद्र हा  सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर त्याच्या सावलीचा सर्वात गडद भाग पडतो  तेव्हा हे संपूर्ण सूर्यग्रहण होते. 
  • सूर्यग्रहणाची वेळ सकाळी 10:59 पासून सुरू होईल आणि दुपारी 3:07 पर्यंत राहील.

Last solar eclipse 2021 News in Marathi : नवी दिल्ली :  2021 चे शेवटचे सूर्यग्रहण, या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण 4 डिसेंबर (शनिवार) रोजी होणार आहे. जेव्हा चंद्र हा  सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर त्याच्या सावलीचा सर्वात गडद भाग पडतो  तेव्हा हे संपूर्ण सूर्यग्रहण होते. (surya grahan 2021 here when where and how to watch last solar eclipse of this year on 4 december saturday)

सूर्यग्रहणाची वेळ सकाळी 10:59 पासून सुरू होईल आणि दुपारी 3:07 पर्यंत राहील. अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

हिंदू पंचांगानुसार हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. सूर्यग्रहणाची वेळ सकाळी 10:59 पासून सुरू होईल आणि दुपारी 3:07 पर्यंत राहील.

Also Read :  How to watch solar eclipse कसे बघावे सूर्यग्रहण?

भारतात सूर्यग्रहण 2021 कसे पहावे?

2021 चे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही परंतु तुम्ही 4 डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण थेट लाइव्ह ऑनलाइन पाहू शकता.

Also Read :  Surya Grahan सूर्यग्रहणाची वेळ आणि सूतककाळ

ग्रहण पाहताना काय करावे आणि काय करू नये:

  1. सूर्यग्रहण पाहण्यासाठी डोळ्यांचे योग्य संरक्षण आवश्यक आहे कारण सूर्याकडे जास्त वेळ पाहिल्याने तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते.
  2. ग्रहण कॅप्चर करण्यासाठी लेन्सवर एक विशेष सौर फिल्टर आवश्यक आहे.
  3. जर तुम्ही अशा देशात राहत असाल जिथे सूर्यग्रहण पाहता येत नाही, तर ते व्हर्च्युली देखील पाहिले जाऊ शकते.
  4. सूर्याकडे थेट पाहू नका.
  5. पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पाहू नका.
  6. ग्रहण पाहण्यासाठी सामान्य सनग्लासेस वापरू नयेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी