Surya Grahan 2021: ४ डिसेंबर रोजी सूर्यग्रहण, गरोदर महिलांनी घ्या 'ही' काळजी

Surya Grahan 2021 news in Marahi: ४ डिसेंबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातील काही भागांतून पहायला मिळणार आहे. सूर्यग्रहण सुरू असताना गरोदर महिलांनी काळजी घेणं गरजेचं असतं असं मानलं जातं.  ( surya grahan 2021 solar eclipse 4 December pregnant women should take precaution and follow tips during the grahan)

surya grahan 2021 solar eclipse 4 December pregnant women should take precaution and follow tips during the grahan
सूर्यग्रहणावेळी गरोदर महिलांनी घ्या 'ही' काळजी 
थोडं पण कामाचं
 • भारतात सूर्यग्रहण सुरू असताना गरोदर महिलांनी काळजी घेणं गरजेचं असतं असं मानलं जातं.
 • 2021 चे शेवटचे सूर्यग्रहण, या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण 4 डिसेंबर (शनिवार) रोजी होणार आहे.
 • हिंदू पंचांगानुसार हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे.

Last solar eclipse on 4 December 2021: नवी दिल्ली :  2021 चे शेवटचे सूर्यग्रहण, या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण 4 डिसेंबर (शनिवार) रोजी होणार आहे. जेव्हा चंद्र हा  सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर त्याच्या सावलीचा सर्वात गडद भाग पडतो  तेव्हा हे संपूर्ण सूर्यग्रहण होते.  

सूर्यग्रहणाची वेळ सकाळी 10:59 पासून सुरू होईल आणि दुपारी 3:07 पर्यंत राहील. अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

हिंदू पंचांगानुसार हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. सूर्यग्रहणाची वेळ सकाळी 10:59 पासून सुरू होईल आणि दुपारी 3:07 पर्यंत राहील.

.भारतीय संस्कृतीत ग्रहण काळात गरोदर महिलांनी (Pregnant Woman) विशेष सावधगिरी आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊयात काय आहेत हे सल्ले आणि ग्रहण काळात गरोदर महिलांनी काय काळजी घ्यायला हवी.

 1. जर आपण ज्योतिषशास्त्र आणि प्राचीन मान्यतांचा विचार केला तर गरोदर महिलांना ग्रहण काळात स्वयंपाक करणे, झोपणे असा सल्ला दिला जातो. 
 2. ग्रहण सुरू असताना गरोदर महिलांनी घराबाहेर पडण्यापासून टाळले पाहिजे आणि विशेषत: ग्रहण अजिबात पाहू नये. 
 3. ग्रहणामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गरोदर महिलेने जिभेवर तुळशीची पाने ठेवून हुनमान चालीसाचं पठन करावे असा सल्लाही दिला जातो.
 4. ग्रहण सुरू असताना गर्भवती महिलांनी धारदार किंवा टोकदार वस्तुंचा वापर करणे टाळावे असंही म्हटलं जातं. कैची, सूई आणि चाकू यांसारख्या वस्तू ग्रहण काळात गरोदर महिलांनी वापरणे टाळावे असाही सल्ला दिला जातो.
 5. ग्रहण संपल्यावर गरोदर महिलांनी आंघोळ करावी, असे केल्याने होणाऱ्या बाळाला त्वचेच्या संबंधी कोणतेही आजार होत नाही असा सल्लाही दिला जातो.
 6. अनेकजण असाही सल्ला देतात की, ग्रहण सुरू असताना नॉन व्हेज खाऊ नये. ग्रहण काळात असे पदार्थ खाल्याने पचन प्रक्रिया चांगली होत नाही असंही म्हटलं जातं.
 7. ग्रहण पाहताना घ्यायची काळजी 
 8. सूर्यग्रहण पाहताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहणे डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे सूर्यग्रहण पाहताना दुर्बिण, टेलिस्कोप, ऑप्टिकल कॅमेराचा वापर करुन पहावे.

(टिप: आम्ही या गोष्टींचं समर्थन करत नाही. मात्र, ग्रहण काळात काही गोष्टी न करणं हे चांगलं असल्याची अनेकांची मान्यता आहे आणि आम्ही त्याचं केवळ वृत्तांकन करत आहोत.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी