Surya Grahan 2022 : नवी दिल्ली : वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar eclipse) 30 एप्रिलला होणार आहे. हे सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पंचांगानुसार या सूर्यग्रहणाचा दिवस आणि वेळ काय असेल, जाणून घेऊया- हिंदू कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्यातील अमावस्या (New moon) 30 एप्रिल या दिवशी येते. पौराणिक कथेनुसार राहू आणि केतू या पाप ग्रहांमुळे ग्रहणाची स्थिती निर्माण होते.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री 12:15 पासून सुरू होईल आणि पहाटे 4:8 पर्यंत चालेल. सूर्यग्रहण मेष राशीत होईल. सध्या राहू मेष राशीत गोचरत आहे. पंचांगानुसार या दिवशी सूर्य, चंद्र आणि राहूचा संयोग मेष राशीत होईल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे आंशिक ग्रहण असल्याचे मानले जाते. यामुळेच या ग्रहण काळात सुतक कालावधी वैध राहणार नाही. सूर्यग्रहणाच्या दिवशी काही अशी कामे आहेत, जी या दिवशी कधीच करू नये. नाहीतर आपल्याला वाईट परिणामाला सामोरे जावे लागते. यामुळेच आपण जाणून घेणार आहोत, कोणत्या कार्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि कोणती कामे केली पाहिजेत.
अधिक वाचा : ट्विटर आपल्या ताब्यात आल्यानंतर इलाॅन मस्कचा हा मास्टर प्लॅन
ग्रहणाच्या वेळी देवाचे चिंतन, मनन, देवाच्या नावाचा जप करावा. या काळात जर आपण पुण्य केलं तर आपल्याला फायदा होत असतो. ग्रहण सुटल्यानंतर अंघोळ करुन दान केलं पाहिजे.
ग्रहण काळात मन शांत ठेवून सर्व कार्य केले पाहिजे असे केल्यानं सर्व अशूभ ग्रहांचा प्रभाव दूर होत असतो. यामुळे या दिवशी घरात किंवा घराबाहेर वाद-विवाद, मतभेद, भांडण करू नये. घरात वाद- विवाद, किंवा भांडण केल्याने आपल्या पितृ नाराज होत असतात.
सूर्यग्रहणाच्या दिवशी शनि आमवस्य़ा आहे, यामुळे यादिवशी चुकूनही गरीब आणि गरजू लोकांचा अपमान करू नये, नाहीतर शनीदेव नाराज होत असतात. कारण शनीदेव त्या लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतात, यासह शनीदेव आपल्या कर्मानुसार फळ देत असतात. यामुळे कोणाचा अपमान होणार नाही असे आचारण ठेवा.
अधिक वाचा : कंगनाच्या धाकड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
ग्रहणाच्या दिवशी चुकूनही जमीनवर खोदकाम करू नये, झाड कापू नये. हे अशूभ मानले जाते. जर आपण हे केलं तर आपलं आयुष्य कमी होत असते. झाड कापण्याऐवजी या दिवशी तुम्ही झाड लावावे.
या दिवशी चुकूनही न पैसे देतो अन्न पदार्थ किंवा कोणती वस्तू घेऊ नये. धार्मिक मान्यतानुसार, असं केल्यानं आपल्याला आर्थिक संकटे येत असतात.
या दिवशी शनी आमवस्य़ा देखील आहे. या दिवशी मांस- मद्यचं सेवन करू नये. यामुळे ग्रहणाचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर पडत असतो. शिवया आपल्याला या गोष्टींची सवय देखील जडू शकते. जर सहकुंटुबाने काळ्या उडीदाची खिचडी खाल्ली तर शनीची ग्रह दशा ठीक होत असते.
जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम होतो, या वेळी सूर्यग्रहणाचा या राशींवर काय परिणाम होतो, जाणून घ्या
अधिक वाचा : 'एसी लोकल'चा प्रवास होणार 'कूल', तिकिटांच्या दरात मोठी कपात
मेष राशीत सूर्यग्रहण आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना त्याचा जास्तीत जास्त प्रभाव पाहायला मिळेल. सूर्यग्रहणामुळे तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. या काळात महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल. शत्रूंकडून नुकसान होऊ शकते. धनहानी होऊ शकते. दुखापत होण्याची भीती राहील. वरिष्ठांशी संबंध प्रभावित होऊ शकतात.
कर्क राशीच्या लोकांना संयम ठेवावा लागेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र राहूच्या संपर्कात येईल. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. या काळात मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. निराशा आणि अज्ञात भीतीची परिस्थिती देखील असू शकते. पैसा खर्च होऊ शकतो.
वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात अपयश येऊ शकते. म्हणून आपल्या प्रतिमेची काळजी घ्या. विनाकारण वाद टाळा. वाद वगैरे मध्ये पडू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. आणि तुम्हाला मिळणाऱ्या नफ्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल. खर्चात अचानक वाढ होऊ शकते.
सूर्यग्रहणाची अशुभता टाळण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करावा. यासोबतच शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारावी. आहार आणि दिनचर्येची विशेष काळजी घ्या. सकारात्मक राहा आणि वाणीतील गोडवा आणि स्वभावात नम्रता ठेवा.