Surya Grahan 2023: सूर्यग्रहण ही ब्रह्मांडातील सर्वात मोठी खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहणावर जगभरातील शास्त्रज्ञांचं लक्ष असतं. कारण सूर्यग्रहणाचा सर्वच्या सर्व 12 राशींवर शुभ-अशुभ प्रभाव पडत असतो, असं सांगितलं जातं. सूर्यग्रहण काही राशीच्या लोकांसाठी पर्वणी समजली जाते. कारण त्यांचं आयुष्य आनंदानं ओतपौत भरून जात असतं. तर काही राशींसाठी मात्र ते अशुभ संकेत देणार ठरत असतं.
यंदा म्हणजे सन 2023 मधील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिलला लागणार आहे. त्यामुळे सूर्यग्रहण कुठे दिसेल, ते शुभ की अशुभ, ग्रहणाचा सूतक काळ कधी सुरू होईल, अशी प्रश्ने अनेकांना पडली आहेत. सूर्यग्रहणाच्या काळात घरात शुभ कार्य केली जात नाही तर मंदिरं देखील बंद ठेवण्यात येतात. देवाची पूजा देखील या काळात वर्ज असते. सोबतच ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाचे काही नियम आहेत. ते पाहणं देखील महत्त्वापूर्ण असतं.
सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधीच सूतक काळ सुरू होत असतो. ग्रहण समाप्त होताच सूतक काळातून सुटका होत असते, असे सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण इतकंच सूतक काळाला महत्त्व आहे. सूतक काळात काय करावे आणि काय करू नये, याबाबत आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलो आहे.
खगोल शास्त्रज्ञांनुसार, यंदा 20 एप्रिल रोजी सूर्यग्रहण लागणार आहे. सूर्यग्रहण सकाळी 7 वाजून 5 मिनिटाला सुरू होणार असून ते दुपारी 12 वाजून 29 मिनिटांला समाप्त होणार आहे. याचा अर्थ असा, की सूर्यग्रहण काळ 5 तास 24 मिनिटांचा असेल. परंतु हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधीच सूतक काळ सुरू होत असतो. सूतक काळ अशुभ मानला जातो. सूतक काळात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. त्यामुळे ग्रहण काळात काय करावं आणि काय करू नये, असे काही नियम सांगितले गेले आहेत. विशेष म्हणजे नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा देखील सल्ला आपली वडीलधारी मंडळी देतााना दिसते. गरोदर महिलांसाठी सूतक काळ महत्त्वाचा मानला जातो. अशा महिलाना सूतक काळात खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जातात. कारण ग्रहण काळाचा उदरात वाढणाऱ्या बाळावर अशुभ प्रभाव पडतो, असे म्हटलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण दिसत नसलं त्या भागात देखील सूतककाळ पाळला जातो. परंतु, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह दिसून येतात. मात्र, काही लोक असं काही नसल्याचं सांगतात. सूर्यग्रहण जिथं दिसतं, तिथला सूतककाळ ग्राह्य धरला जातो. इतर ठिकाणच्या सूतक काळाला फारसं महत्त्व नसतं.
(Disclaimer: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. Times Now Marathi याचे समर्थन करत नाही. यासाठी विशेषतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)