Swami Samarth Prakat Din 2022, akkalkot swami samarth songs mantra and bhajans : 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये ही तिथी रविवार ३ एप्रिल रोजी आहे. गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रकट दिन आहे.
स्वामी भक्तांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी समर्थ मंगळवेढा येथून अक्कलकोट नगरीत प्रकट झाले. हा दिवस होता चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सर. इंग्रजी कालगणनेनुसार रविवार ६ एप्रिल १८५६.
धर्म, अध्यात्म यांच्याशी संबंधित दिवस हे नेहमी तिथीप्रमाणे पाळले जातात. यामुळेच यंदाच्या वर्षी चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी म्हणजेच रविवार ३ एप्रिल २०२२ रोजी स्वामी भक्त स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करतील.
मराठी मनोरंजनसृष्टीने श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित चित्रपट, गाणी, गाण्यांचे आल्बम, टीव्ही मालिका, वेब सीरिज, माहितीपट (डॉक्युमेंट्री), लघुपट (शॉर्टफिल्म) अशा अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. जगभर पसरलेल्या स्वामी भक्तांना कठीण काळात आशेचा किरण दाखवणारी अनेक स्वामीभक्तीची गीतं लोकप्रिय आहेत.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी गायलेले 'माझा ठाई रे.... ' तसेच सुरेश वाडकर यांच्या आवाजातील स्वामी समर्थांचा जपमंत्र अशी अनेक भक्तीगीते श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांना प्रिय आहेत.
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञेविना काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || २ ||
उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा || ३ ||
खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ || ४ ||
विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | न सोडी कदा स्वामी जया घेई हाती || ५ ||
कोणतीही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व निराळा तारक मंत्र म्हणावा. संकटे दूर होतात.