मुंबई: वर्षातील पहिले सूर्यग्रहण(solar eclipse) ३० एप्रिल शनिवारी लागणार आहे. या दिवशी शनिचरी अमावस्याही आहे. हे सूर्यग्रहण रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल जे १ मे सकाळी ४ वाजून ७ मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणारम्यान विशेष काळजी घेणे गरजेचे असते. जाणून घ्या प्रेग्नंट महिलांनी ग्रहणकाळात काय काळजी घ्यावी.
अधिक वाचा - मुलांच्या खाण्यातून वगळा 'हे' पदार्थ
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होतो. याचा परिणाम चांगला वाईट दोन्ही पद्धतीचा असू शकतो. ग्रहणादरम्यान सूर्याकडून निघणाऱ्या हानिकारक किरणांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. या किरणांचा प्रभाव प्रेग्नंट महिला आणि बाळावरही होतो.
सूर्यग्रहणादरम्यान प्रेग्नंट महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. असं मानलं जातं की या काळात घराबाहेर पडू नये. त्यामुळे हानिकारक किरणाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.
सूर्यग्रहणादरम्यान प्रेग्नंट महिलांनी धारदार वस्तूचा वापर करू नये. असे केल्याने बाळामध्ये विकृती निर्माण होते असे म्हटले जाते. या दरम्यान, शिवणकाम तसेच कापण्याचे काम करू नये.
सूर्यग्रहणाच्या कुप्रभावापासून बचावासाठी प्रेग्नंट महिलांनी तुळशीचे पान जीभेवर ठेवून हनुमानाची आराधना केली पाहिजे.
सूर्यग्रहण संपल्यानंतर प्रेग्नंट महिलांनी आंघोळ करावी. नाहीतर बाळास त्वचेसंबंधित आजार होऊ शकतात.
या दरम्यान महिलांनी आपल्या आराध्य देवतेची उपासना करावी.
अधिक वाचा - बिअर पिणाऱ्यांना महागात पडणार आपला हा शौक
हे आंशिक सूर्यग्रहण असेल आणि ते भारतात दिसणार नाही. ज्या ठिकाणी ग्रहण दिसत नाही, तिथे सुतक काळही वैध नाही, असे ज्योतिष तज्ज्ञ आणि धार्मिक तज्ज्ञांचे मत आहे.