न धुतलेल्या तव्यावर चपाती बनवत असाल तर पतीवर येऊ शकते संकट

आध्यात्म
Updated May 22, 2019 | 19:01 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

वास्तुदोष केवळ घराचे दरवाजे वा खिडक्या चुकीच्या दिशेने असल्यासच निर्माण होत नाही तर किचनमधील भांड्यांचाही योग्य पद्धतीने प्रयोग न केल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

roti
चपाती  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: घरातील सगळ्यात पवित्र जागा देवघरानंतर किचन असते. किचनमध्ये लक्ष्मीचा सहवास असल्याचे मानले जाते. त्यामुळे किचन नेहमी साफ ठेवणे तितकेच गरजेचे असते. किचन जर व्यवस्थित नसेल अथवा तेथे ठेवलेली भांडी योग्य ठेवली नसल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. याचा नकारात्मक परिणाम घरातील व्यक्तींवर होतो. तुम्ही जर न धुतलेला तवा चपाती बनवण्यासाठी वापरत असाल तर त्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या कुटुंबातील मुख्य व्यक्ती म्हणजेच तुमच्या पतींवर होऊ शकतो. 

तव्याचा किचनमध्ये योग्य प्रकारे वापर केला न गेल्यास घरात आर्थिक चणचण अथवा आजार येण्याचा धोका असतो. ज्या घरांमध्ये तव्याला न धुता चपात्या केल्या जातात ते घर आर्थिकदृष्टया समृद्ध होत नाही. यामागे वास्तुदोषाचे कारणही असू शकते. तव्याला राहूचे प्रतीक मानले जाते. तर राहूची अवकृपा असेल तर घरात अशुभ गोष्टी घडतात. त्यामुळे घरातील तवा तुमचे नशीब बनवू आणि बिघडवूही शकतो. जाणून घ्या तव्यामुळे कोणते वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. 

या कारणांमुळे निर्माण होऊ शकतो वास्तुदोष

  1. किचन जर अस्वच्छ असेल तर त्याचा घरातील मुख्य व्यक्तीवर वाईट परिणाम होतो. 
  2. सतत एकच तवा अथवा कढई न धुता चपाती बनवण्यासाठी वापरत असाल तर त्याचा परिणाम पुरुषांवर खास करून पतीवर होतो. 
  3. रात्री जेवल्यानंतर भांडी तशीच ठेवू नका. खासकरून तवा नेहमी स्वच्छ धुवून सुकवून ठेवा. 
  4. ज्या तव्याचा वापर होत नसेल तर असा तवा किचनमध्ये कोणाच्या दृष्टीस पडेल असा ठेवू नका. तव्याला अशा जागी ठेवा जिथे कोणाची नजर पडणार नाही. 
  5. तुम्ही जिथे भांडी ठेवता तिथे लक्षात ठेवा की तवा अथवा कढई कधीही उलटी ठेवू नये. हे शुभ नसते.
  6. गॅस बंद केल्यानंतर तवा कधीही गॅसवर तसाच ठेवू नका. थंड झाल्यावर धुऊन स्टँडमध्ये ठेवा. 
  7. कधीही गरम तव्यावर पाणी टाकू नका. यामुळे तुमच्या पतीवर वाईट प्रभाव होऊ शकतो. 
  8. तवा अथवा कढई ठेवण्याची जागा नेहमी जेवण बनवण्याच्या डाव्य बाजूला असावी. 
  9. तवा लिंबू आणि मीठाच्या सहाय्याने स्वच्छ करा. यामुळे तवा जितका जास्त चमकेल तितकेच तुमचे नशीबही. 
  10. तवा चमकवण्यासाठी कधीही त्याच्यावर धारदार वस्तूंचा वापर करू नका. 

या छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरात सकारात्मक उर्जा येऊ शकते. घरात सुख-संपत्ती आणि वैभव कायम राहते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
न धुतलेल्या तव्यावर चपाती बनवत असाल तर पतीवर येऊ शकते संकट Description: वास्तुदोष केवळ घराचे दरवाजे वा खिडक्या चुकीच्या दिशेने असल्यासच निर्माण होत नाही तर किचनमधील भांड्यांचाही योग्य पद्धतीने प्रयोग न केल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola