Ekvira Devi Palkhi Sohala : एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. उद्या 28 जानेवरी रोजी एकविरा देवीचा पालखी सोहळा पार पडणार आहे. राज्यभरातून अनेक भाविक दर्शनाला येत असतात. अनेकांचे हे श्रध्दास्थान आहे. लाखो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
अधिक वाचा :बॉलिवूडच्या अभिनेत्यांपेक्षा जास्त स्मार्ट आहेत यूट्युबर
पण वाचक मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? पांडू पुत्र पांडवांचा देवीशी संबंध येतो. एका पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.
कार्बन डेटिंगनुसार असे आढळते की, या मंदिराची बांधणी दोन कालखंडांमध्ये झाली आहे - इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि 5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत.
अधिक वाचा :IAS टीना डाबीची छोटी बहीण रियाची कमाई वाचून येईल चक्कर
हे मंदिर डोंगरावर असून मंदिराच्या आत जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे. अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी होते. या अतिप्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते.