Shukra Pradosh Vrat 2022 । मुंबई : ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिले प्रदोष व्रत आज २७ मे रोजी आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. हे व्रत महिन्यातून दोनदा येते, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. प्रदोष व्रत सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष म्हणतात. प्रदोष व्रत शुक्रवारी आल्यास त्याला शुक्र प्रदोष म्हणतात. आज शुक्र प्रदोष व्रत आहे. (The first Pradosh vrat of the jyeshtha month today, Learn the method of worship).
अधिक वाचा : ...तर आहारात करा व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध पदार्थांचा समावेश
प्रारंभ - २७ मे २०२२ सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांपासून सुरू
समाप्त - २८ मे २०२२ दुपारी १ वाजून ९ मिनिटांनी समाप्त
शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळपासूनच शुभ योग सुरू झाला आहे. हा योग रात्री ९.१० वाजेपर्यंत राहील. हे दोन्ही योग शुभ कार्यासाठी शुभ मानले जातात. या दोन्ही योगांमध्ये काम करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. २७ मे रोजी पहाटे ५.२५ वाजता सर्वार्थ सिद्धी योग सुरू झाला आहे. हा योग रात्रभर राहील. या योगात कोणतेही काम करणे खूप शुभ मानले जाते.
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरूअसलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.