सावधान रहा ! 11 ऑक्टोबरपासून शनी देवाचा तुमच्या राशीत प्रवास सुरू; कोणाला होईल भरभराट तर कोणाला होईल नुकसान

आध्यात्म
भरत जाधव
Updated Oct 12, 2021 | 14:38 IST

शनी देवाने 11 ऑक्टोबरपासून आपला सरळ मार्गाला सुरुवात केली आहे. ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शनी देवाची ही चाल खूप महत्त्वपूर्ण असते.

The journey of Saturn God in your zodiac
सर्व राशीत शनी देवाचा प्रवास सुरू;कोणाला सुख तर कोणाला दु:ख  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सर्व राशींमध्ये शनी देवाचा प्रवेश, कोणाल होणार लाभ कोणाला होणार नुकसान
  • करिअरमध्ये स्थिरतेबरोबरच पदोन्नतीचे मार्गही खुले होण्याची शक्यता.
  • जमीन खरेदी करण्यासाठी परिस्थिती असणार अनुकूल

नवी दिल्ली: शनी देवाने 11 ऑक्टोबरपासून आपला सरळ मार्गाला सुरुवात केली आहे. ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शनी देवाची ही चाल खूप महत्त्वपूर्ण असते. कारण याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर पडत असतो.  यामुळे काही लोकांच्या आयुष्याची गाडी वेग पकडू लागते, तर काहींच्या आयुष्यात समस्या सुरू होतात. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशींवर याचा प्रभाव कसा पडणार आहे याची माहिती घेणार आहोत... 

मेष:-

10 व्या घरात शनी तुमच्या राशीतून जात आहे. हे घर कुंडलीत कर्माचे आहे. ही तुमच्यासाठी समाधानकारक परिस्थिती आहे. करिअरमध्ये स्थिरतेबरोबरच पदोन्नतीचे मार्गही खुले होतील. तुमची लायकी सिद्ध करण्यासाठी तुम्हाला अनेक संधी मिळतील.  मात्र, तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हुशारीने पैसे खर्च करा. 

वृषभ:-

शनी तुमच्या राशीतून 9 व्या घरात जात आहे. नोकरदार लोकांसाठी ही चांगली बातमी आहे. तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित कराल. व्यापाऱ्यांना त्यांच्या बोलण्यावर आणि वागणुकीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा छोटे छोटे वाद होऊ शकतात. आर्थिक स्थिती ठीक राहील. यावेळी विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जातील आणि चांगले ज्ञान प्राप्त करतील. 

मिथुन:-

शनी तुमच्या राशीतून 8 व्या घरात मार्गक्रम करत आहे. कुंडलीतील हे स्थान रहस्य, शिक्षण, वारसा इत्यादींचे प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ असा की तुम्हाला ज्ञान मिळवण्यात काही अडचणी येऊ शकतात.  आळशीपणामुळे तुमच्या समस्या अधिक वाढू शकतात, म्हणून ते सोडून द्या. ही गुंतवणूक करण्याची योग्य वेळ नाही. जर तुमच्याकडे अशी योजना असेल तर ती पुढे ढकलण्यातच शहाणपणा आहे.

कर्क:-

तुमच्या राशीतून शनी 7 व्या घरात जात आहे. याचा सरळ अर्थ तुम्हाला सतर्क करणे आहे. आपल्या कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचे मित्र आणि नातेवाईकांशी तुमचे संबंध बिघडू देऊ नका. यात तुमचा फायदा आहे. या दरम्यान तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुमची काही रखडलेली कामे पूर्ण होतील.

सिंह-

शनि तुमच्या राशीतून 6 व्या घराकडे जात आहे. कुंडलीतील हे स्थान शत्रू, रोग इत्यादी दर्शवते. या महिन्यांत शत्रूची कोणतीही चाल यशस्वी होणार नाही आणि तुम्ही कुशलतेने त्यांच्यावर विजय मिळवाल. तुम्हाला तुमच्या आवडत्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक सुख चांगले राहील.

कन्या:-

शनी तुमच्या राशीतून 5 व्या घरात मार्ग करत आहे. कुंडलीतील हे स्थान घर, शिक्षण, मुले इत्यादी दर्शवते. हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी ठरेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. चांगले उत्पन्न मिळेल. मात्र, तुमच्या लव्ह लाईफमध्ये किरकोळ भांडणे होऊ शकतात. परंतु यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

तुला:-

शनी तुमच्या राशीतून चौथ्या घराकडे जात आहे. कुंडलीत हे स्थान आनंदाचे प्रतीक मानले जाते. या काळात तुम्हाला मोठे बदल दिसतील. जर तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. सर्व अडथळे दूर होतील. घरी पालकांसोबत काही वैचारिक मतभेद असू शकतात.

वृश्चिक:-

शनि तुमच्या राशीतून तिसऱ्या स्थानाकडे जात आहे. नोकरदार लोकांसाठी ही चांगली चिन्हे आहेत. बॉसशी चांगले संबंध निर्माण होतील.  तुम्ही ऑफिसमध्ये मेहनती असाल आणि ही आवड तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन उंचीवर घेऊन जाईल.  व्यापारी वर्गातील लोक प्रवास करू शकतात. कुटुंबातील सदस्य तुमच्यासोबत दिसतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

धनु:-

शनी तुमच्या राशीतून दुसऱ्या घराकडे जात आहे. कुंडलीमध्ये हे घर संपत्ती, कुटुंब इत्यादी दर्शवते. म्हणजेच तुम्हाला कमाईचे वेगवेगळे स्रोत मिळणार आहेत. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे.  जीवनात काही समस्या असतील पण तुम्ही त्यातून सहज बाहेर पडाल.

मकर:-

शनी तुमच्या राशीतून कर्क राशीकडे जात आहे. म्हणजे शनीची साडेसाती.  अशा परिस्थितीत लोकांना थोडा दिलासा मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.  व्यावसायिक जीवनात काही बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल.

कुंभ:-

तुमच्या 12 व्या घरात शनीचे संक्रमण होत आहे. तुमच्या परदेश प्रवासाला विलंब होऊ शकतो. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडथळे येऊ शकतात. पण नंतर हे अडथळे तुमच्या प्रगतीचे कारण बनतील.

मीन:-

तुमच्या राशीमध्ये अकराव्या स्थानावर शनि मार्गक्रम करत आहे. तुमचा व्यवसाय चांगला होईल. उत्पन्न देखील वाढेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.  नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी