Astro News: सूर्याचे रोहिणी नक्षत्रात या दिवशी होणार संक्रमण; वातावरणात होणार मोठे बदल

आध्यात्म
Updated May 12, 2022 | 10:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Surya Nakshtra Parivartan 2022 । जेव्हा सूर्य ग्रह रोहिणी नक्षत्रात असतो तेव्हा तो वृषभ राशीच्या १० ते २० अंशापर्यंत राहतो. दरम्यान २५ मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात संक्रमण करेल.

The transition of the Sun to the constellation Rohini will take place on this day
सूर्याचे रोहिणी नक्षत्रात या दिवशी होणार संक्रमण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २५ मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात संक्रमण करेल.
  • ज्योतिषाचार्य यांच्या मते २५ मे रोजी सकाळी ८.४६ पासून रोहिणी नक्षत्रात सूर्याचे संक्रमण होईल.
  • रोहिणी नक्षत्रात सूर्याच्या भ्रमणाचा कालावधी १४ दिवसांचा असेल.

Surya Nakshtra Parivartan 2022 । मुंबई : जेव्हा सूर्य ग्रह रोहिणी नक्षत्रात असतो तेव्हा तो वृषभ राशीच्या १० ते २० अंशापर्यंत राहतो. दरम्यान २५ मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात संक्रमण करेल. तो दिवस धरून पुढचे एकूण नऊ दिवस मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यांत हवेचे तापमान खूप जास्त असते आणि उन्हाळ्याची सर्वाधिक तीव्रता जाणवते. या घटनेला नौतपा म्हणतात. या दिवसांमध्ये सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असतो. सूर्यदेव सुमारे १५ दिवस या नक्षत्रात राहील. म्हणूनच गरमीच्या या पहिल्या ९ दिवसांच्या काळाला नौतपा असे म्हणतात. यावेळी नौतपा २५ मे ते ३ जून पर्यंत असेल. (The transition of the Sun to the constellation Rohini will take place on this day). 

अधिक वाचा : Air Force चा जवान हनी ट्रॅपमध्ये अडकला, पोलिसांकडून अटक

२५ तारखेला सूर्य करणार संक्रमण

ज्योतिषाचार्य यांच्या मते २५ मे रोजी सकाळी ८.४६ पासून रोहिणी नक्षत्रात सूर्याचे संक्रमण होईल. सूर्य दर १५ दिवसांनी एका नक्षत्राचा आनंद घेत असतो. रोहिणी नक्षत्रातील गोत्राला नौतपा असे म्हणतात. भास्कर या नक्षत्रात आल्यावर पृथ्वीचे तापमान वाढते. दरम्यान ८ जून रोजी सकाळी ६.४० पर्यंत सूर्य रोहिणी नक्षत्रात राहील. यानंतर मृगाशिरा नक्षत्रात प्रवेश करेल.

चांगल्या पावसाचे संकेत

ज्योतिषशास्त्रानुसार रोहिणी नक्षत्रात सूर्याच्या भ्रमणाचा कालावधी १४ दिवसांचा असेल. आगामी पावसाळ्याची वेळ निश्चित करण्यात ही वेळ महत्त्वाची भूमिका बजावते. यंदा मेष संक्रांतीच्या वेळी चंद्र नक्षत्र भरणी असल्यामुळे रोहिणीचा निवास समुद्रकिनारी असणार आहे. रोहिणी समुद्रकिना-यावर राहणार असून काळ रजकाच्या घरी राहणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे यंदा ८० टक्क्यांहून अधिक पाऊस होण्याचा योग आहे. 

नौतपाचा वैज्ञानिक दृष्टीकोन 

नौतपाच्या काळात सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर येत असतात. त्यामुळे तापमानात वाढ होत राहते. अतिउष्णतेमुळे मैदानी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. ते समुद्राच्या लाटांना आकर्षित करते. त्यामुळे थंड हवा जमिनीकडे जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी