Pitru Paksha: पितरांना प्रसन्न ठेवण्यासाठी वर्षातील 15 दिवस असतात महत्त्वाचे, यादरम्यान नका करू शुभ अन् मंगल कार्य

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 18, 2022 | 08:43 IST

गणपती बाप्पाच्या (Ganapati Bappa) पूजेनंतर आश्विन (Ashwin) महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा ते अमावस्या पर्यंतचा 15 दिवसांचा संपूर्ण पंधरवडा पितृ पक्ष (Pitru Paksha )म्हणून ओळखला जातो. यावेळी ते 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. हा पक्ष हा काळ म्हणजे पूर्वजांना संतुष्ट करण्याचा असतो.

Pitru Paksha
पितरांना प्रसन्न ठेवण्यासाठी वर्षात 15 दिवस असतात महत्त्वाचे,  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत असणार पितृपक्ष
  • वर्षातील ३६५ दिवसांपैकी १५ दिवस आपल्या पितरांना समर्पित आहे.

Pitru Paksha 2022 Date and Time: गणपती बाप्पाच्या (Ganapati Bappa) पूजेनंतर आश्विन (Ashwin) महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा ते अमावस्या पर्यंतचा 15 दिवसांचा संपूर्ण पंधरवडा पितृ पक्ष (Pitru Paksha )म्हणून ओळखला जातो. यावेळी ते 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. हा पक्ष हा काळ म्हणजे पूर्वजांना संतुष्ट करण्याचा असतो. यावेळी कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही. यासोबतच कोणतेही नवीन काम किंवा नवीन करार करू नये. पितरांपुढे नतमस्तक होण्याची वेळ आहे.

वर्षातील १५ दिवस पितरांना समर्पित

हा पक्ष वर्षातील ३६५ दिवसांपैकी १५ दिवस आपल्या पितरांना समर्पित आहे, ज्याप्रमाणे संपूर्ण महिना महादेवाला समर्पित असतो. मातृशक्तीसाठी वर्षातून दोनदा शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री असे ९ दिवस असतात.  त्याचप्रमाणे शास्त्रात पितरांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. यावरून पितृ आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे स्पष्ट होते.

पितर असतात अनेक, जाणून घ्या कोण आहेत पितृ

देव एक असतो, पण पितर अनेक असू शकतात. त्याचा संबंध आपल्या परंपरेशी आहे. आता हे पितर कोण आहेत हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. पित्र हे आपल्या जीवनात अदृश्य सहाय्यक आहेत. आपल्या जीवनातील कार्ये आणि ध्येयांवर त्यांचे पूर्ण शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतात. म्हणजे पूर्वज प्रसन्न झाले तर त्यांना त्यांचा अदृश्य आधार मिळत राहतो.त्याचप्रमाणे पूर्वज सुखी असतील तर जीवनाची गाडी सुरळीत चालते.

Read Also : फडणवीसांच्या भेटीसाठी मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला ‘सागर’वर

पितरांचे तर्पण आणि श्राद्ध आवश्यक 

पितृ म्हणजे ज्यांनी पूर्वीचा देह त्यागला आहे, पण अजून पुढचा देह प्राप्त केलेला नाही.  हिंदू तत्वज्ञान मानते की आत्मा स्थूल शरीर सोडतो, मग मृत्यू होतो. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाते. श्राद्ध म्हणजे श्रद्धा व्यक्त करणे आणि तर्पण म्हणजे त्यांचे समाधान करणे. आता प्रश्न असा आहे की श्रद्धा कशी व्यक्त करायची आणि कशी अर्पण करायची. पितरांच्या आशीर्वादाने श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला जीवन, पुत्र, कीर्ती, बल, वैभव-सुख आणि धन्य-धान्य प्राप्त होते, असेही शास्त्रात सांगितले आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण कृष्ण पक्षात म्हणजे अश्विन महिन्यातील १५ दिवस नियमित स्नान करावे, पितरांना नमस्कार करावा आणि शेवटच्या दिवशी पिंडदान करत श्राद्ध करावे.

Read Also : Monsoon season 1st Day : शेतकरी, एसटी महामंडळसाठी या तरतूद

पितरांबद्दल नेहमी आदर आणि भावना ठेवा

श्राद्ध आणि तर्पण हे परंपरेने पूर्वजांना संतुष्ट करण्याची गोष्ट आहे, परंतु ते थोडे विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न करा. घाटावर जाणे, गयाला जाणे, पिंड दान करणे या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण आपले प्रेमभाव हा नेहमीच असला पाहिजे फक्त पितृ पाठापूर्ता प्रेम भाव नसावा.  पितृ पक्ष ही भावना आणि आदर व्यक्त करण्यासाठी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी