Chanakya Niti: महिलांमध्ये असतील हे चार अवगुण तर आयुष्य होईल बर्बाद

Chanakya Niti in Marathi: आपल्या आयुष्याच्या संबंधित अनेक गोष्टी नीतीशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी स्त्रियांबद्दलही खूप काही लिहिले आहे. त्यांच्या मते कुटुंब उभारण्यात आणि बर्बाद करण्यात महिलांचे गुण आणि अवगुण खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

these 4 bad habits of women affect your life said acharya chanakya niti read in marathi
Chanakya Niti: महिलांमध्ये असतील हे चार अवगुण तर आयुष्य होईल बर्बाद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कुटुंब घडवण्यात महिलांचे गुण बजावतात अत्यंत महत्त्वाची भूमिका
  • घरातील महिला शिक्षित असतील तर कुटुंबाचा विकास होतो
  • स्त्रियांचा अहंकार, लोभ हा कुटुंबाचा नाश करण्यास कारणीभूत असतो

Chanakya niti: आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्रात आपल्या मनुष्याच्या आयुष्याच्या संदर्भात अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आपल्या आयुष्यातील गोष्टींसंदर्भात अनेक रहस्य त्यांनी सांगितली आहेत. चाणक्य नीतीमध्ये सांगितल्या प्रमाणे उपाय किंवा त्या गोष्टी केल्यास आपल्या आयुष्यात सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. आचार्य चाणक्य यांनी महिलांच्या संदर्भात नीतीशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कुटुंब घडवण्यात आणि कुटुंब बर्बाद करण्यात महिलांचा वाटा मोठा असतो. स्त्री सद्गुणी असेल तर कुटुंबाची भरभराट होते. तर स्त्रीमध्ये दुर्गुण असतील तर त्या कुटुंबाचा नाश होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अशा अवगुणी महिलांपासून दूर रहा. (these 4 bad habits of women affect your life said acharya chanakya niti read in marathi)

अशिक्षित महिला

आचार्य चाणक्य सांगतात की, शिक्षणामुळे कुटुंब आणि समाजात मोठा बदल होतो. सुशिक्षित आणि हुशार स्त्री असेल तर कुटुंब घडवण्यात तिचे योगदान फार मोलाचे ठरते. याच्या उलट म्हणजे जी महिला अशिक्षित आहे ती कुटुंब उद्वस्त करू शकते. तसेच यामुळे समाजाचेही नुकसान होऊ शकते.

लालची स्त्री

आचार्य चाणक्य सांगतात की, पुरुष असो किंवा महिला जर कुणाच्याही मनात लोभाची भावना आली तर त्याच्यासोबतच आसपासच्या लोकांनाही ते बर्बाद करू शकतात. स्त्रीमध्ये जर लोभाची भावना असेल तर त्याचा परिणाम तिच्या परिवारावर होतो.

हे पण वाचा : वयाच्या 13व्या वर्षी करिना 'याच्या' प्रेमात झाली होती वेडी​

अहंकारी महिला

आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याचा अहंकार हा त्याच्यासाठी विनाशकारी ठरतो. एखादी स्त्री अहंकारी असले तर माता सरस्वती आणि माता लक्ष्मी या दोघीही तिच्यावर नाराज होतात. अशा महिला आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धीचाही वापर करत नाहीत. तसेच या महिलांच्या उद्धटपणामुळे त्या घरातील सुख-समृद्धी पूर्ण नष्ट करतात.

खोटे बोलणे 

जर एखाद्या महिलेला खोटे बोलण्याची सवय असेल तर तिचं कुटुंब बर्बाद करण्यासाठी तो अवगुण कारणीभूत ठरू शकतो. आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या महिला नेहमी खोट बोलतात त्या आपल्या परिवाराचीही फसवणूक करू शकतात.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी