शनिदेवाच्या कृपेचे 'हे' आहेत पहिले संकेत, तुम्हाला मिळाल्यास समजा जीवन भरुन जाईल सुख-समृद्धीनं

शनीची साडे साती सारखी महादशा खूप त्रास निर्माण करते. पण तितकच शनिदेव प्रसन्न झाल्यावर व्यक्तीला सर्व बाजूनं म्हणजे चौफेर लाभ होतो.

Shani dev
Shani dev  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • शनी देव (Lord Shani) म्हणजे न्यायाचे देवता.
  • शनीची साडे साती सारखी महादशा खूप त्रास निर्माण करते.
  • शनिदेवाची नाराजी आयुष्य उद्धवस्त करायला ही वेळ लावत नाही.

मुंबई: शनी देव (Lord Shani)  म्हणजे न्यायाचे देवता. कर्मांनुसार फळ देणारे शनी देवाची कृपा होताच व्यक्तीचं जीवन सुख-समृद्धीनं भरुन जातं.  तर दुसरीकडे शनिदेवाची नाराजी आयुष्य उद्धवस्त करायला ही वेळ लावत नाही. त्यामुळे सगळेच लोक शनिदेवाला खूप घाबरतात. त्यावर शनीची साडे साती सारखी महादशा खूप त्रास निर्माण करते. पण तितकच शनिदेव प्रसन्न झाल्यावर व्यक्तीला सर्व बाजूनं म्हणजे चौफेर लाभ होतो.

शनीची कृपा होण्याचे संकेत 

ज्याप्रमाणे आपल्या जीवनात शनी खराब असण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येतात, तसंच शनी शुभ किंवा शनिदेवाची कृपा मिळण्याची चिन्हेही स्पष्टपणे दिसतात. 

आता जाणून घेऊया कोणती चिन्हे आहेत जी दर्शवतात की व्यक्तीवर शनिदेवाची कृपा होऊ लागली आहे किंवा होणार आहे.

  • जर शनिवारी तुमचे शूज किंवा चप्पल चोरीला गेली तर ती गोष्ट खूप शुभ संकेत आहेत. ही गोष्ट म्हणजे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि आता तुमची सर्व कामं एक-एक करुन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
  • ज्यावेळी तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे आले किंवा तुम्ही पटकन श्रीमंत होऊ लागलात तर समजून जा की तुमच्यावर शनिदेवाची कृपा होऊ लागली आहे. शनि हा खूप अफाट संपत्ती आणि ऐश्वर्य देणारे देवता आहेत. ज्यावेळी ही गोष्ट घडते तेव्हा भरपूर दान करा. गरिबांना मदत करा. 
  • तुमची प्रतिष्ठा वाढू लागत असेल तर समजून जा की तुमच्यावर शनीच्या कृपेचे चांगले परिणाम होत आहेत. शनि प्रसन्न झाल्यावर व्यक्तीची कीर्ती दूरवर पसरते. अस झाल्यास शनिदेवाचे आभार मानावे आणि त्यांची पूजा करावी. 

शनिदेवाची कृपा असल्यास व्यक्तीचं आरोग्यही चांगलं राहतं. जर का तुमचं आरोग्य सतत चांगलं असेल, तर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल, तर हे देखील शनिदेवाच्या कृपेचं लक्षण आहे. जर तुमच्यासोबत असं घडत असेल तेव्हा रुग्णांना मदत करावी, रुग्णांना देणगी द्या. तसंच शनिवारी मंदिरात जाऊन शनि देवाची पूजा करावी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी