Buddha Purnima 2022 । मुंबई : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणार्या पौर्णिमा तिथीचे व्रत आणि उपासना करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. पौर्णिमेच्या व्रताने मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. या महिन्यात पौर्णिमेचे व्रत १६ मे रोजी करण्यात येणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा सुदामा भगवान श्रीकृष्णाला (Krishna) भेटण्यासाठी द्वारकेला आला तेव्हा देवाने त्यांना पौर्णिमा व्रताचे महत्त्व सांगितले. या व्रताच्या प्रभावामुळे सुदामाचे (Sudama) दारिद्र्य दूर झाले असे म्हणतात. त्यामुळे या व्रताचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय बौद्ध धर्माचे संस्थापक महात्मा बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या (Vaishakh Purnima) दिवशी झाला होता. म्हणूनच याला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. (These deities are worshiped on the day of Buddha Purnima).
अधिक वाचा : बेवड्याने पोलिसांना फोन करून २ थंडगार बिअरची दिली ऑर्डर
पंचांगानुसार वैशाख महिन्याची पौर्णिमा सोमवार १६ मे २०२२ रोजी आहे. या पौर्णिमेला चंद्राचे दर्शन घेणे अत्यंत लाभदायक मानले जाते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंतीही साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमेचा शुभ मुहूर्त १५ मे रोजी दुपारी १२.४५ ते १६ मे रोजी सकाळी ९.४३ पर्यंत आहे. उदय तिथी असल्याने १६ मे रोजी पौर्णिमा व्रत ठेवण्यात येणार आहे.
वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा विशेष मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने मनातील मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. तसेच सर्व प्रकारच्या पापकर्मांपासून मुक्ती मिळते. याशिवाय या दिवशी चंद्रदेवतेच्या दर्शनाचाही नियम आहे. या दिवशी चंद्र पाहिल्यास चंद्र देवतेचा आशिर्वाद मिळतो असे मानले जाते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने अनेक पटींनी पुण्य मिळते, असा समज आहे. एवढेच नाही तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून पवित्र नदीत स्नान केले जाते. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांची पूजा देखील विशेष फलदायी मानली जाते.