Chanakya Niti: नवरा बायकोमधील 'या' चुका उद्धवस्त करतात सोन्याचा संसार; कोणत्या गोष्टींपासून राहिलं पाहिजे दूर, जाणून घ्या

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 04, 2022 | 13:00 IST

चाणक्य नीतिनुसार जर नवरा-बायकोने काही चुका केल्या आणि त्या समोर आल्या तर त्यांचा सोन्याचा संसार उद्धवस्त होत असतो.  दरम्यान पती-पत्नीचं एकमेंकांमधील नाते कसे असावे, कसे नसावे याचा उपदेशही आचार्य चाणक्यांनी केले आहेत.

Chanakya Niti
Chanakya Niti: नवरा बायकोमधील 'या' चुका उद्धवस्त करतात सोन्याचा संसार; कोणत्या गोष्टींपासून राहिलं पाहिजे दूर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने राग टाळणे आवश्यक आहे.
  • पती-पत्नीने कधीही एकमेकांचा अपमान करू नये.
  • संशयाने तुमच्या संसारात प्रवेश केला तर तुमचा सोन्याचा संसार उद्धवस्त होण्यास वेळ लागत नाही.

Chanakya Niti For Husband Wife Relationship: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या  चाणक्य नीतिमध्ये (Chanakya Niti)अतिशय सोप्या पद्धतीने जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. एक महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि व्यावहारिक ज्ञान देणारे आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीसाठीही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतिनुसार जर नवरा-बायकोने काही चुका केल्या आणि त्या समोर आल्या तर त्यांचा सोन्याचा संसार उद्धवस्त होत असतो. दरम्यान पती-पत्नीचं एकमेंकांमधील नाते कसे असावे, कसे नसावे याचा उपदेशही आचार्य चाणक्यांनी केले आहेत. आज आपण पती-पत्नींनी कोणत्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे हे जाणून घेणार आहोत. (These mistakes between husband and wife destroy the world of gold, become cautious)

अधिक वाचा  : Vivah Muhurat : आज 4 नोव्हेंबरनंतर सुरू होतील मंगल कार्य

राग 

सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने राग टाळणे आवश्यक आहे.रागाच्या भरात ती व्यक्ती आपली सद्सद्विवेकबुद्धी गमावून बसते आणि ती अशी कडू गोष्ट बोलू किंवा वागू शकते, ज्यामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते.  रागाच्या भरात काही वेळा छोट्या गोष्टीमुळे मोठं मोठे वाद होत असतात, त्यामुळे राग टाळा.

अपमान

 पती-पत्नीने कधीही एकमेकांचा अपमान करू नये. विशेषत: इतर कोणत्याही व्यक्तीसमोर अपशब्द बोलू नका. तुम्ही जर एकमेंकांचा अपमान करत असाल तर  इतरांच्या नजरेतील तुमची प्रतिमा मलीन होते. लोक वेळोवेळी तुमची चेष्टा करतात. त्यामुळे पती-पत्नीच्या नात्याचा आदर राखा. तसेच, इतरांसमोर एकमेकांशी आदराने वागा.

अधिक वाचा  : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा

खोटारडेपणा 

पती-पत्नीने एकमेकांशी कधीही खोटे बोलू नये. नेहमी एकमेकांशी प्रामाणिक रहा. अन्यथा एक खोटे बोलण्याने पती-पत्नीमध्ये संशय निर्माण होत असतो. एकदा का संशयाने तुमच्या संसारात प्रवेश केला तर तुमचा सोन्याचा संसार उद्धवस्त होण्यास वेळ लागत नाही. यामुळे शक्य होईत तितकं खरं बोलण्याचा प्रयत्न नवरा-बायकोने केला पाहिजे.  

चर्चा न करणे 

पति-पत्‍नी के बीच कभी भी संवादहीनता यानी कि बातचीत बंद करने की स्थिति नहीं आना चाहिए. कोणतेही नाते वाढण्यासाठी आणि नाते सुरू होण्यासाठी संवाद महत्त्वाचा असते. जर तुम्ही संवाद केलाच नाही किंवा एकमेंकांशी बोलले नाही तर एकमेंकांचा स्वभाव कळणार नाही. पती- पत्नीमधील संवाद हरवला तर नात्याला काही अर्थ राहत नाही. तुमच्यातील चर्चा, संवाद, गप्पा बंद झाल्यातर एकमेंकांमधील गैरसमज वाढू लागतात. गैरसमज होण्यास सुरुवात झाली तर तुमच्या नात्यातील कटूता येत असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी