Name Astrology: प्रेमात एकनिष्ठ असूनही या लोकांना अनेकदा मिळतो धोका; तुमच्याही नावाचा समावेश आहे?

आध्यात्म
Updated May 31, 2022 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Name Astrology for Love Life । नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपल्याला हे देखील कळू शकते की व्यक्तीला त्याचे खरे प्रेम मिळेल की नाही. खरे प्रेम जरी मिळाले तरी त्याच्या आयुष्यभर सोबत राहील की नाही, म्हणजेच त्याचे लव्ह पार्टनरशी लग्न होईल की नाही शिवाय आयुष्यभर साथ देईल की नाही.

These people are often deceived in love life 
प्रेमात एकनिष्ठ असूनही या लोकांना अनेकदा मिळतो धोका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण खूप माहिती मिळवू शकतो.
  • ज्या लोकांचे नाव E अक्षराने सुरू होते अशी लोक मनमिळाऊ स्वभावाची असतात.
  • ज्या लोकांचे नाव B ने सुरू होते ते खूप भावूक स्वभावाचे असतात.

Name Astrology for Love Life । मुंबई : नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपल्याला हे देखील कळू शकते की व्यक्तीला त्याचे खरे प्रेम मिळेल की नाही. खरे प्रेम जरी मिळाले तरी त्याच्या आयुष्यभर सोबत राहील की नाही, म्हणजेच त्याचे लव्ह पार्टनरशी लग्न होईल की नाही शिवाय आयुष्यभर साथ देईल की नाही. याबाबतची सर्व माहिती मिळवली जाऊ शकते. लव्ह लाईफ, वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात. आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची प्रेमात अनेकदा फसवणूक होते. या लोकांना त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून सहज ओळखता येते. (These people are often deceived in love life). 

अधिक वाचा : गरमीच्या दिवसात असे कलिंगड खाल्ल्यास आपोआप वजन होईल कमी

या अक्षरांनी नाव सुरू असणारे लोक प्रेमात धोका खातात

  1. ज्या लोकांचे नाव B अक्षराने सुरू होते - ज्या लोकांचे नाव B ने सुरू होते ते खूप भावूक स्वभावाचे असतात. हे लोक रोमान्सच्या बाबतीत मोकळ्या मनाचे असतात. हे लोक लगेचच सुंदर लोकांकडे आकर्षित होतात आणि प्रेमात पडतात. या कमकुवतपणामुळे ते प्रेमातही खूपवेळा फसतात. 
  2. ज्या लोकांचे नाव E अक्षराने सुरू होते - असे लोक खूप मजेदार आणि मनमोकळ्या स्वभावाचे असतात. त्यामुळे ते कोणाच्याही प्रेमाच लगेचच पडतात आणि ते आपल्या जोडीदाराप्रती गंभीरही होतात. कोणताही विचार न करता कोणाच्याही प्रेमात पडल्यामुळे या लोकांची खूप फसवणूक होते. 
  3. ज्या लोकांचे नाव M अक्षराने सुरू होते - या नावाचे लोक खूप चांगले जोडीदार असल्याचे सिद्ध होतात, कारण ते जोडीदाराशी खूप निष्ठावान असतात. ते आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात, तरीही त्यांची प्रेमात फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.
  4. ज्या लोकांचे नाव Q अक्षराने सुरू होते - अशा लोकांना आयुष्यात सर्व काही मिळते, पण प्रेमाच्या बाबतीत त्यांची झोळी रिकामीच राहते. विविध कारणांमुळे यांचे त्यांच्या पार्टनरशी जुळत नाही आणि त्यामुळेच ते प्रेमाच्या बाबतीत गरीब राहतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी