Griha Pravesh Rules: गृहप्रवेशाच्या वेळी हे नियम महत्त्वाचे आहेत; घरात शांती आणि आशिर्वाद राहतो

आध्यात्म
Updated Apr 26, 2022 | 16:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Griha Pravesh Vidhi । आपल्या स्वप्नातील घर खरेदी करणे आणि पुन्हा त्याला सजवणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर बांधणे पुरेसे नाही. त्यात सुख समृद्धी असणेही आवश्यक आहे.

These rules are important for Griha Pravesh
गृहप्रवेशाच्या वेळी हे नियम महत्त्वाचे आहेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार घरात प्रवेश करण्यापूर्वी पंडिताकडून शुभ मुहूर्त जरूर पाहावा.
  • शुभ मुहूर्तावर फुल आणि तोरणांनी घर सजवा.
  • गृहप्रवेशाच्या वेळी सर्वप्रथम दरवाजाची पूजा करावी.

Griha Pravesh Vidhi । मुंबई : आपल्या स्वप्नातील घर खरेदी करणे आणि पुन्हा त्याला सजवणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर बांधणे पुरेसे नाही. त्यात सुख समृद्धी असणेही आवश्यक आहे. घरात शांतता आणि माता लक्ष्मीचा वास असेल तेव्हाच माणूस सुखाने जगू शकतो. प्रत्येकजण आपल्या घरातील सदस्यांच्या जीवनात चांगले वातावरण येण्यासाठी प्रार्थना करत असतो मात्र वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्याच्या माध्यमातून घरात सुख-समृद्धी नांदते. (These rules are important for Griha Pravesh). 

हिंदू धर्मात गृहप्रवेशाबाबत काही नियम दिलेले आहेत. घरात प्रवेश करण्यापूर्वी काही खास मुहूर्त काढले जातात. त्यानुसार घरात गृहप्रवेश करण्याचा काळ, वेळ ठरवली जाते. घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण गृहप्रवेशाचे काही नियम जाणून घेऊया, ज्यांचे पालन केल्याने फायदा होतो.

अधिक वाचा : हा घ्या पुरावा...., त्यादिवशी मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याचा असा पाहूणचार

गृहप्रवेशापूर्वी जाणून घ्या हे नियम

१) ज्योतिषशास्त्रानुसार घरात प्रवेश करण्यापूर्वी पंडिताकडून शुभ मुहूर्त जरूर पाहा.
२) असे मानले जाते की रविवार आणि शनिवारी गृहप्रवेश करू नये.

३) होळीपूर्वी देखील गृहप्रवेश करू नये असे बोलले जाते. कारण नवीन घरात पहिली होळी पेटवली जात नाही असा समज आहे. 
४) दिवाळी आणि नवरात्रीच्या आधीचे दिवस गृहप्रवेशासाठी सर्वोत्तम मानले जातात.
५) गृहप्रवेशाच्या दिवशी व्रत करावे. सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून कुटुंबीयांसह घरात प्रवेश करावा.
६)  शुभ मुहूर्तावर फुल आणि तोरणांनी घर सजवावे. 
७) असे मानले जाते की घरात प्रवेश करण्यापूर्वी घराचा दरवाजा स्वच्छ आणि कोऱ्या कपड्याने झाकून ठेवावा आणि घरात कलश बसवावा.
८) गृहप्रवेशाच्या वेळी सर्वप्रथम दरवाजाची पूजा करावी.
९) दाराच्या चौकटीच्या पूजेसाठी केवळ सौभाग्यवान महिला किंवा ब्राह्मणांनाच पुढे करावे.
१०) पती-पत्नीही एकत्र पुढे जाऊ शकतात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी