Remove Bad Luck Remedies: सकाळी केलेली ही कामे उघडू शकतात तुमच्या नशीबाचे दार; बॅडलक पासून होईल सुटका

आध्यात्म
Updated Jun 17, 2022 | 10:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bad Luck Upay । सत्कर्माचे फळ चांगलेच मिळते असे अनेकदा ऐकायला मिळते. पण अनेक वेळा चांगली कामे करूनही माणसाला हवे ते सर्व मिळत नाही. एखाद्या व्यक्तीचे नशीब त्याला अनुकूल नसते.

These work done in the morning can open the door of your destiny
सकाळी केलेली ही कामे उघडू शकतात तुमच्या नशीबाचे दार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नियमितपणे आपल्या इष्ट देवाची पूजा केल्याने व्यक्तीचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते.
  • गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील अनेक मंत्रांपैकी एक आहे.
  • हिंदू धर्मात तुळशीला पवित्र स्थान आहे.

Bad Luck Upay । मुंबई : सत्कर्माचे फळ चांगलेच मिळते असे अनेकदा ऐकायला मिळते. पण अनेक वेळा चांगली कामे करूनही माणसाला हवे ते सर्व मिळत नाही. एखाद्या व्यक्तीचे नशीब त्याला अनुकूल नसते. लक्षणीय बाब म्हणजे ग्रहांच्या वाईट प्रभावामुळे असे घडते. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही कामांबद्दल सांगण्यात आले आहे, जे नियमितपणे सकाळी केल्यास व्यक्तीचे दुर्भाग्य दूर होते. (These work done in the morning can open the door of your destiny). 

अधिक वाचा : टिक टिक वाजते डोक्यात... दहावीचा निकाल दुपारी १ वाजता

सकाळी केलेली ही कामे चमकवतील तुमचे नशीब 

  1. इष्ट देवाजी पूजा करा - असे मानले जाते की नियमितपणे आपल्या इष्ट देवाची पूजा केल्याने व्यक्तीचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते. भगवंताच्या आशिर्वादाने माणसाचे सर्व संकट दूर होऊन त्याची प्रगती होत जाते. त्यामुळे नियमितपणे तुमच्या इष्ट देवाजी पूजा केली पाहिजे. 
  2. गायत्री मंत्राचा जप केल्याने संकट होईल दूर - गायत्री मंत्र हा देखील हिंदू धर्मातील अनेक मंत्रांपैकी एक आहे. हा अतिशय प्रभावी मंत्र आहे. असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मकता निर्माण होते. तसेच दुःख आणि दारिद्र्य देखील नष्ट होते. असे मानले जाते की या मंत्राचा नियमित जप माणसाला यशाकडे घेऊन जातो.
  3. सकाळी डोळे उघडताच या मंत्राचा जप करा - धार्मिक ग्रंथानुसार सकाळी उठल्याबरोबर व्यक्तीने आपल्या तळव्यांचे दर्शन घेतले पाहिजे. असे म्हणतात की व्यक्तीच्या हातात माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि भगवान विष्णूचे स्थान असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर हाताचे तळवे जोडून या मंत्राचा जप करावा आणि नंतर तळवे पाहा. असे केल्याने व्यक्तीचे अशुभ दूर होते. मंत्र - कराग्रे वसते लक्ष्मीः कर्मधे सरस्वती । करमुले तु गोविंदाः प्रभाते कर्दर्शनम् । 
  4. तुळशीला दिवा लावा - हिंदू धर्मात तुळशीला पवित्र स्थान आहे. असे मानले जाते की, तुळशीची नित्यनियमाने पूजा केल्याने व्यक्तीचे दुर्भाग्य दूर होऊन त्याला सौभाग्य प्राप्त होते. सकाळी उठल्यावर, स्नान वगैरे झाल्यावर तुळशीवर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते.
  5. सूर्याला अर्घ्य द्या - सर्व ग्रहांपैकी सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य हा पूर्वजांशी संबंधित आहे. त्यामुळे सूर्यदेवाला नियमित जल अर्पण केल्याने पितरांची अर्थात पूर्वजांची कृपा प्राप्त होते. अंघोळीनंतर तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण केल्याने व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळते. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. त्याचबरोबर पितृदोषापासूनही मुक्ती मिळते.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी