Astrology:या ३ राशींची मुले असतात चांगली मुले आणि जावई, जिंकतात सगळ्यांची मने

आध्यात्म
Updated Jun 06, 2022 | 13:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology: अनेकदा असं म्हटलं जातं की मुली आई-वडिलांची मुलांपेक्षा जास्त काळजी घेतात. मात्र काही मुले या बाबतीत मुलींपेक्षा कमी नसतात. हे केवळ चांगली मुलेच नसतात तर चांगले जावईही बनतात. 

zodiac sign
या ३ राशींची मुले असतात चांगली मुले आणि जावई, जिंकतात मने 
थोडं पण कामाचं
  • वृषभ राशीची मुले बुद्धिमान, मेहनती आणि इमोशनल असतात.
  • कर्क राशीची मुले खूप हुशार, समजूतदार आणि संस्कारी असतात
  • धनू राशीची मुले कर्मठ, इमानदार आणि मनाने निर्मळ असतात

मुंबई: आई-बापाच्या नजरेत चांगला मुलगा आणि सासू-सासऱ्यांच्या नजरेत चांगला जावई होणे ही काही सोपी गोष्ट नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ३ राशींची(zodiac sign) मुले असतात जी चांगली मुले आणि सोबतच चांगला जावई म्हणून सिद्ध होतात. ही मुले आपल्या स्वभावाने आणि सेवाभावाने आई-वडील आणि सासू-सासऱ्यांचे मने जिंकून घेतात. ही मुले त्यांचा खूप सन्मान करतात. तसेच त्याबदल्यात त्यांच्याकडून प्रेम आणि आशीर्वाद मिळतात. ही मुले खूप लकी असतात ज्यामुळे वरिष्ठ लोकांचे प्रेम मिळते. this 3 zodiac sign boys have good behaviour with there father and mother in laws

अधिक वाचा - लाच मागण्यात कानून के हाथ महसूल विभागापेक्षा आखुड

या ३ राशीची मुले असतात लकी

वृषभ रास 

वृषभ राशीची मुले बुद्धिमान, मेहनती आणि इमोशनल असतात. यांना कोणाचे दुख बघवत नाही. त्यामुळे यांच्याशी संबंधित व्यक्तींवरही तितकेच प्रेम करतात. तसेच आपल्या आई-वडिलांवर जितके प्रेम करतात तितकेच प्रेम ते आपल्या पत्नीच्या आई-वडिलांवर करतात. त्यांचीही तितकेच काळजी घेात. त्यांना खूप सन्मान देतात. 

कर्क रास 

कर्क राशीची मुले खूप हुशार, समजूतदार आणि संस्कारी असतात. ते मोठ्यांचा सन्मान करतात आणि आपली जबाबदारी नीट सांभाळतात. याच कारणामुळे ते कुटुंबात सगळ्यांचे प्रिय असतात. ते आपल्या आई-वडिलांची खूप काळजी घेतात. तसेच आपल्या सासू-सासऱ्यांचीही काळजी घेतात. यासाठी एक मुलगा म्हणून आणि जावई म्हणूनही चांगले असतात. 

अधिक वाचा - पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही - सुप्रिया सुळे

धनू रास 

धनू राशीची मुले कर्मठ, इमानदार आणि मनाने निर्मळ असतात. हे लोक ज्यांच्याशी जोडलेले असतात त्यांना खूप प्रेम करतात आणि त्यांची काळजीघी घेतात. लग्नानंतर ते खूप सोप्या पद्धतीने आपल्या सासू-सासऱ्यांचे मन जिंकून घेतात. त्यांचा हसमुख स्वभाव लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी