Bad Habit: दारिद्रयाच्या रस्त्यावर नेतात व्यक्तीच्या या ४ वाईट सवयी, लगेचच द्या सोडून नाहीतर...

आध्यात्म
Updated Jul 04, 2022 | 20:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bad Habit:धार्मिक ग्रंथात काही बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या मनुष्यास दरिद्री बनवतात. इतकंच नव्हे तर व्यक्तीच्या या सवयीमुळे माता लक्ष्मी रुसून जाते. 

laxmi mata
दारिद्रयाच्या रस्त्यावर नेतात व्यक्तीच्या या ४ वाईट सवयी 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या अशा काही वाईट सवयींबद्दल सांगितले आहे ज्यामुळे व्यक्ती दारिद्रयतेच्या दिशेने जाते.
  • इतकंच नव्हे तर वेळेतच या वाईट सवयी सोडल्या नाहीत तर लक्ष्मी माता रुसून ते घर सोडून जाते.
  • जाणून घेऊया या सवयींबद्दल

मुंबई: माता लक्ष्मी(laxmi mata) ही धनदेवीचे रूप असते. ज्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा असते त्याला जीवनात प्रत्येक सुखसुविधा मिळतात. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की तिच्यावर लक्ष्मी मातेची कृपा असावी. धार्मिक ग्रंथ तसेच ज्योतिषातही लक्ष्मी मातेचा महिमा आणि तिला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. मात्र काही उपाय न करताही काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तर लक्ष्मी मातेची कृपा मिळवता येते. This 4 habits makes man beggar

अधिक वाचा - 'त्या' घटनेमुळे मुख्यमंत्री शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर

ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या अशा काही वाईट सवयींबद्दल सांगितले आहे ज्यामुळे व्यक्ती दारिद्रयतेच्या दिशेने जाते. इतकंच नव्हे तर वेळेतच या वाईट सवयी सोडल्या नाहीत तर लक्ष्मी माता रुसून ते घर सोडून जाते. जाणून घेऊया या सवयींबद्दल

वेळेतच या ४ वाईट सवय़ी सोडा

शास्त्रात सूर्योदयाच्या आधी उठण्यासाठी योग्य काळ सांगितला आहे. असे मानले जाते की ब्रम्ह मुहूर्तावर उठणे लाभदायक असते. जी व्यक्ती सूर्योदयानंतर उठते तिच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहत नाही. तसेच संध्याकाळच्या वेळेस झोपणेही अशुभ मानले गेले आहे. संध्याकाळच्या वेळेस झोपणाऱ्या व्यक्तीला आर्थिक समस्या जाणवतात.

आपल्या आसपास साफसफाई ठेवणे

ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. यासाठी म्हटले जाते की लक्ष्मी मातेला घरी बोलावण्यासाठी घर साफ ठेवणे गरजेचे असते. जी व्यक्ती घरात साफ-सफाई ठेवत नाही तेथे लक्ष्मी माता राहत नाही. नियमितपणे सकाळच्या वेळेस साफ-सफाई केल्यास घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो. 

मीठ हातात देणे

ज्योतिषशास्त्रात आणि धार्मिक ग्रथांमध्ये सांगितले आहे की अनेकदा मीठ हातात देण्याची सवय असते. जे शुभ नसते. व्यक्तीची ही सवय लक्ष्मी मातेला नाराज करते. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्याला मीठ देता ते एखाद्या भांड्यातून द्यावे. 

अधिक वाचा - उर्फीचा बेधडक अंदाज, व्हिडिओ व्हायरल

ताटात जेवण टाकणे

शास्त्रात सांगितले आहे की अन्नाचा संबंध लक्ष्मी मातेशी असतो. अनेकदा लोक ताटात जेवण टाकतात. अन्न वाया घालवल्याने लक्ष्मी माता रुसून जाते. अन्न वाया घालवल्याने त्या कुटुंबाला दारिद्रयाचा सामना करावा लागतो. सोबतच वाढ होत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी