Ganesh Chaturthi 2022:  गणेश चतुर्थीला बाप्पाच्या या रंगाच्या मूर्तीची करा स्थापना, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

आध्यात्म
Updated Aug 30, 2022 | 12:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ganesh Chaturthi: या बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. घरांघरात गणपतीची मूर्ती स्थापित करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. 

ganesh chaturthi
गणेश चतुर्थीला बाप्पाच्या या रंगाच्या मूर्तीची करा स्थापना 
थोडं पण कामाचं
  • शास्त्रानुसार घरात गणपतीच्या स्थापनेबाबत अनेक नियम सांगितले आहेत.
  • कोणत्याही शुभ कार्याआधी गणपती बाप्पाची पुजा केली जाते
  • जर तुम्हाला घरात सुख-समृद्धी आणि शांती हवीये तर तुम्ही तुमच्या घरात सफेद रंगाच्या गणपतीची स्थापना करू शकता.

मुंबई: देशभरात गणेशोत्सव(ganeshostav) मोठ्या धुमधामीत साजरा केला जातो. या वर्षी ३१ ऑगस्ट म्हणजेच बुधवारी गणपती(ganpati) आपल्या घरी विराजमान होत आहे. या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजाअर्चा केली जाते. गणपतीची स्थापना आपल्या घरात करण्याआधी काही गोष्टींचे ध्यान ठेवणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रात(vastu shastra) गणपतीची स्थापना आणि पुजेसाठी काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. This colour ganesha idol will complete your wish

अधिक वाचा - आत्महत्येत देशात महाराष्ट्राचा क्रमांक प्रथम

वास्तुशास्त्रात सांगितलेत गणपती स्थापनेचे नियम

शास्त्रानुसार घरात गणपतीच्या स्थापनेबाबत अनेक नियम सांगितले आहेत. यात त्यांच्या प्रतिमेपासून ते त्याची डिझाईन, रंग, सोंडेचा आकार आणि दिशा याबाबत सांगितले आहे. गणपतीच्या पुजेदरम्यान याची काळजी घेतल्यास घरात सुख-समृद्धी आणि धन-वैभवाची कमतरता येत नाही. 

धन प्राप्तीसाठी गुलाबी रंगाच्या गणपतीची करा पुजा

कोणत्याही शुभ कार्याआधी गणपती बाप्पाची पुजा केली जाते. याशिवया धन प्राप्तीसाठी गणपतीची पुजा केली जाते. आर्थिक वैभव मिळवण्यासाठी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात गुलाबी रंगाचा गणपती ठेवू शकता. 

सफेद रंगाचा गणपती असतो पवित्र

जर तुम्हाला घरात सुख-समृद्धी आणि शांती हवीये तर तुम्ही तुमच्या घरात सफेद रंगाच्या गणपतीची स्थापना करू शकता. वास्तुनुसार सफेद रंगाचा गणपती अतिशय पवित्र मानला जातो. अशातच घरात सफेद रंगाच्या गणेश मूर्तीचा स्थापना करून घरात शांती कायम ठेवू शकता. 

अधिक वाचा- बेळगावातील मराठी भाषिकांना न्याय मिळणार?

गणपती बाप्पा असतात संकटहर्ता

याशिवाय गणपतीची पुजा केल्याने अनेक अडकलेली कामे पूर्णण होतात. जर तुमचे एखादे काम अडकलेले आहे अथवा त्यात अडथळे येत आहेत तर घरात शेंदूर रंगाच्या गणपतीची स्थापना केली पाहिजे घरात शेंदूर रंगाच्या गणपतीची दररोज पुजा केल्याने संकटे दूर होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी